उद्यापासून पवित्र श्रावण महिन्याला प्रारंभ, पहिल्या सोमवारी शंकराच्या पिंडीवर ही शिवमूठ वाहा, लाभ होईल

हिं दू कॅलेंडरनुसार श्रावण महिना दिनदर्शिकेत पाचव्या स्थानावर येतो. मान्यतेनुसार, भग वान भोलेनाथांच्या पूजेसाठी श्रावन महिना खूप खास आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत करून भगवान शंकराची आराधना केल्यास आपल्या सर्व मनो कामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे.
या महिन्यात ब्रह्मांडाचे पालनपोषण करणारे भगवान विष्णू चार महिने क्षीरसागरात नि*द्रेत अशा स्थितीत सृष्टीची जबाबदारी शिवाच्या खांद्यावर येते. श्रावन महि न्यात येणाऱ्या सोमवारच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. श्रावन सोमवारी शिवलिंगाचा जलाभिषेक, बेलपत्र आणि भोलेनाथ यांची पूजा केल्याने विशेष फळ मिळते.
श्रावन महिन्यात कावड यात्रा काढल्या जातात, ज्यामध्ये पवित्र नद्यांमधून गं*गाजल घेतले जाते आणि प्रसिद्ध ज्योतिर्लिं*गावर जलाभिषेक केला जातो. याशिवाय शिवभक्त श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने ज्योतिर्लिं*गाचे दर्शन आणि पूजा करतात.
समुद्रमंथन झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन करून मनुष्यांवरील धोका टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी विशेष पूजा करून त्या च्याप्रती आदर व्यक्त केला जातो. अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे. हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या श्रावण महिन्याची सुरूवात यंदा 29 जुलै पासून होणार आहे.
श्रावण महिना म्हणजे सण आणि व्रत- वैकल्यांची रेलचेल असल्याने या महिन्याबद्दलची उत्सुकता अधिक असते. श्रावणी सोमवार, मंगळवार, शुक्रवारी खास पूजा करण्या ची पद्धत आहे. श्रावणी सोमवार हे व्रत शंकरासाठी अस ते या महिन्यात प्रत्येक सोमवारी एक शिवमूठ भगवान शंकराला अर्पण करण्याची पद्धत आहे.
यंदा श्रावण महिन्याची सुरूवात जरा जिवंतिका पूजनाने होणार आहे. आता कोरोना संकट आटोक्यात आल्याने मागील दोन वर्ष जसे निर्बंधांत सण साजरे झाले आहेत त्यामधून यंदा भाविकांची सुटका होणार असल्याने या पवित्र महिन्यात पुन्हा मंदिरं भाविकांनी फुलून जाणार आहेत. शंकराच्या आराधनेसाठी श्रावणी सोमवारी पूजा करताना बेल, दूध यांचा शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते.
मग जाणून घ्या यंदा कोणत्या श्रावणी सोमवारी कोणती मूठ दिली जाणार आहे. चातुर्मासामधील सर्वात श्रेष्ठ महिना हा श्रावण महिना आहे. अनेक शिवभक्त श्रावणी सोमवारी उपवास करतात. एक वेळेस उपवास करून संध्याकाळी व्रत सोडण्याची पद्धत आहे.
पहिला श्रावण सोमवार 1ऑगस्ट 2022 रोजी असेल. श्रावण महिन्यात महादेवा चा अभिषेक करण्याचं जितकं महत्व आहे तितकंच ‘शिव मूठ’ वाहण्यालाही विशेष महत्व आहे.
प्रत्येक श्रावणी सोमवारी वेगवेगळ्याप्रकारचे धान्याची मूठ चढवणे लाभदायक असते. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी तांदळाची ‘शिव मूठ’ अर्पण करावी. आपल्या मुठीत तांदूळ घेऊन ते शंकराच्या पिंडीवर वहावेत.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news