राशिभविष्य

श्रावणाचा अखेरचा शुक्रवार ‘या’ चार राशींना करणार करोडपती.

Shravan Shukrawar 2023: श्रावण मास हा पुण्य संचयाचा. दान, सेवा, कष्ट यायोगे या महिन्यात तुम्ही जे काही चांगले कार्य केले असेल त्याचे पुण्य तुमच्या अकाउंटला जमा झालेच म्हणून समजा. ते कमी म्हणून की काय, यंदाच्या श्रावणाचा शेवटचा शुक्रवार श्रावणाचा अखेरचा दिवस असणार आहे. या दिवशी ४ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ स्थिती निर्माण होत आहे.

आपल्या अपार कष्टांना जोवर नशिबाची साथ आणि लक्ष्मी तेचा वरदहस्त लाभत नाही, तोवर कष्टाचे चीज होत नाही आणि यशस्वी म्हणून आपली गणनाही लोक करत नाहीत. मात्र पुढील चार राशींसाठी ही संधी आयती चालून आली आहे तर यांनी त्याचा निश्चित लाभ करून घ्यावा!

यंदा १४ आणि १५ सप्टेंबर अशा दोन दिवसांत श्रावण अमावस्या विभागून आली आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ९ मिनिटांनी अमावस्या संपणार आहे.

तरीही अमावस्येची तिथी १५ तारखेचा सूर्योदय पाहून संपणार असल्याने हा दिवस विशेषत: चार राशींचे भले करूनच जाणार आहे. अमावस्या असूनही ती बाराही राशींसाठी अनुकूल असणार आहे, तरीदेखील पुढील चार राशी अधिक भाग्यवान म्हटल्या पाहिजेत!

वृषभ: वृषभ राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. एखादी चांगली बातमी मिळू शकते. जे नवीन काम सुरू करत आहेत, त्यांना खूप फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील.

कर्क: श्रावणी शुक्रवार भाग्यपालट करणारा ठरेल. नशीब त्यांना साथ देईल. पदोन्नती होऊ शकते, पगारवाढ होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या सर्व आर्थिक समस्या संपतील. लवकरच एखाद्या सहलीला जाण्याचा योग येईल आणि आनंद दुणावेल.धनु:

धनु : धनु राशीच्या लोकांची आतापर्यंत रखडलेली कामे आता पटापट आणि निर्विघ्नपणे पूर्ण होतील. जीवनात सुख-सुविधा वाढतील. आर्थिक अडचणींवर मात करता येईल. आनंदवार्ता समजतील!मकर:

मकर : मकर राशीच्या लोकांना जुन्या त्रासातून, आजारातून, आर्थिक प्रश्नातून सुटका मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आनंद मिळेल. आर्थिक वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button