भक्तहो विसरलात का मला श्री स्वामी समर्थ लिहा..!!

अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..!! श्री स्वामींचे अनुभव जितके कथन करावे तितके कमीच आहेत तरीही अशक्य ही शक्य करतील स्वामी या बोधवाक्याचे खूप मोठी प्रचिती मी आज आपल्या सर्वांना सांगतो.
माझी आई काय वर्षांपूर्वी अचानक खूप आजारी झाली होती. प्रचंड प्रमाणातच तिचे डोके दुखायचे, सतत तीन ते चार दिवस डोके दुखत असायचे. अजिबात आराम मिळत नव्हता म्हणून हॉस्पिटलला नेले असता, तेथे ऍडमिट करून सर्व प्रकारचे टेस्ट करण्यात आल्यात पण काही केल्या आजाराचे निदान होत नव्हते आणि दुखणे ही कमी होत नव्हते.
दोन-तीन दिवसांनी थोडे बरे वाटते आहे असे आईने डॉक्टरांना सांगितले पण अचानकच तिला खूप त्रास सुरू झाला. मग तिला दुसरा हॉस्पिटलला हलवण्यात आले त्याची प्रकृती खूप गंभीर होती. आम्ही सर्वजण अत्यंत मनोभावे स्वामींचे अखंड नामस्मरण करीत होतो. आई कोमात गेलेली होती, तिला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते आईला मेंदू वेष्टनाचा क्षयरोग हा आजार झाला होता.
डॉक्टरांनी तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे असे सांगून, त्यांच्या जवळ कदाचित फार काळ नसावा म्हणून जवळच्या नातेवाईकांना बोलवून घ्या असेही डॉक्टर म्हटले. अशातच कोणीतरी आम्हाला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून धुमावती मंत्राचे तीर्थ व आईच्या डाव्या हाताच्या नाडीवर सोळाव्यात 16 वेळा कालभैरवाष्टक रोज म्हणण्यास सांगितले होते. ही सेवा आम्ही दररोज न चुकता करतच होतो.
सोबतच अखंड नावास्मरण हेच सुरू होते. तीन ते चार दिवसानंतर पहाटे तीन वाजता आईला अचानक जाग आली, कोणीतरी तिला झोपेतून उठवले आहे असे तिला जाणवले, आणि मग या हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर जे इतके दिवस लंडन येथे गेलेले होते ते त्याच दरम्यान नागपूरला आले आणि त्यांनी स्वतः आईची ट्रीटमेंट सुरू केली.
आईला जेव्हा जाग आली तेव्हा आईने तेथील आर एम ओ डॉक्टरांना विचारले मी कुठे आहे. त्यांनी सांगितले तुम्ही काय दिवसापासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात आमच्या आईला मागील दहा ते पंधरा दिवसातील काहीच आठवत नव्हते. ज्यांनी आईला झोपेतून उठवले ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज होते.
यानंतर डॉक्टर स्वतः येऊन आमच्याशी बोलले की हा काहीतरी चमत्कारच आहे. या आजारातून लाखातून एकच रुग्ण वाचतो या प्रसंगा नंतर जवळजवळ महिनाभराने आईला डिस्चार्ज मिळाला. घरी निघताना डॉक्टर म्हणाले की इतक्या मोठ्या आजारपणा नंतर रुग्णात काहीतरी दोष अथवा व्यंग निर्माण होऊ शकतात. पण आज या घटनेला 19 वर्षे झालेत पण अजूनही आमच्या आईचे प्रकृती ठणठणीत आहे. डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी आमचा फॅमिली फोटो घेतला.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद