स्वप्ना मध्ये भगवान शिवांशी संबंधित गोष्टी दिसण्याचा काय असतो अर्थ.?

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे.. स्वप्नात महादेवाशी संबंधित गोष्टी पाहाणं अत्यंत शुभ मानलं जातं. महादेवांच्या या गोष्टींना स्वप्नात पाहाण्याचा अर्थ काय असतो हे जाणून घेऊया.
स्वप्नात महादेवाशी संबंधित गोष्टी पाहाणं अत्यंत शुभ मानलं जातं. महादेवांच्या या गोष्टींना स्वप्नात पाहाण्याचा अर्थ काय असतो हे जाणून घेऊयात. स्वप्न पाहाणं ही एक सर्वसामान्य प्रक्रीया आहे. रात्री झोपल्यावर सर्वजण स्वप्नं पाहातात. कधी Swapna Shastra Shravan Maas एखादं भयानक स्वप्न आपल्याला झोपेतून खडबडून जागं करतं तर कधी एखादं मजेशीर स्वप्न आपल्याला पोट धरुन हसवतं.
कधी एखादं गूढ स्वप्न आपल्याला विचार करायला भाग पाडतं तर कधी आपल्या आसपास झालेल्या घटनाही आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत.
श्रावणाची सुरुवात जेमतेम चार दिवसांवर आली आहे. अशात जगाचा भार वाहाणाऱ्या भगवान शंकराचा आशिर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी वेगवेगळी व्रतवकल्य या महिन्यात केली जातात. हा महिना भक्तीचा महिना म्हणून पाळला जातो.
शंकराच्या अगाध महिमेने प्रकाशमान झालेला महिना म्हणून या महिन्याकडे पाहिलं जातं. अशात स्वप्नात तुम्हाला महादेवांशी संबंधित एखादी वस्तू पाहायला मिळाली तर त्याचा काय अर्थ असतो हे आज आपण पाहाणार आहोत.
स्वप्नात साक्षात महादेवांना पाहाण्याचा काय असतो अर्थ?
भगवान शिवशंकर तुमच्यावर खूष आहेत आणि तुमच्या काही इच्छा ते पूर्ण करणार असल्याचा या स्वप्नाचा अर्थ होतो. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे असाही त्याचा अर्थ होतो.
स्वप्नात महादेवांचं मंदिर पाहाण्याचा काय असतो अर्थ?
स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला दीर्घकाळ काही आजार असल्यास किंवा काही समस्या तुम्हाला दीर्घकाळ भेडसावत असल्यास त्या समस्येपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे असा त्या स्वप्नाचा अर्थ होतो. हे स्वप्न अत्यंत शुभ मानलं जातं.
स्वप्नात महादेवांच्या गळ्यातला साप पाहाण्याचा काय असतो अर्थ?
महादेवांच्या गळ्यातला साप म्हणजे नागराज वासुकी. वासुकीने आपल्या तपस्येने शंकराला प्रसन्न केलं होतं. हे स्वप्न पाहाण्याचा अर्थ तुम्हाला धनलाभ होणार आहे याचे संकेत आहेत.
स्वप्नात महादेवांचं त्रिशूळ पाहाण्याचा काय असतो अर्थ?
सनातन धर्मात शिवाचे त्रिशूळ हे भूतकाळ, भविष्य आणि वर्तमानाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे, जर शिवाचे त्रिशूळ स्वप्नात दिसले तर ते मनुष्याच्या सर्व समस्यांच्या समाप्तीचे लक्षण देखील असू शकते.
स्वप्नात महादेवांचं डमरू पाहाण्याचा काय असतो अर्थ?
जर शिवजींचा डमरू स्वप्नात दिसला तर ते तुमच्या वैयक्तिक जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे लक्षण असू शकते असं स्वप्नशास्त्र सांगतं.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!