स्त्रियांनी बिनधास्तपणे करावे हे एक काम, नवरा नेहमीच खुश राहील, घरात सुख नांदेल.

विद्या किंवा शिकवण – विद्या म्हणजे चांगले ज्ञान कुठूनही मिळत असेल तर ते घ्या, मग ते कोणत्याही व्यक्तीकडून मिळत असेल मग ते चांगले असो किंवा वाईट, छोटे असो किंवा मोठे घेण्यास कधीही संकोच करु नका. कारण की ज्ञानाच्या संचयामुळे आपण आपल्या जीवनाला नवीन दिशा तर देऊच शकतो त्याच बरोबर आपण आपल्या भविष्याचा पाया पक्का करतो. म्हणूनच आपल्याला योग्य ज्ञान असेल तर कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी अवघड नाही.
पण त्यासाठी गरजेचे आहे की ते ज्ञान आपण आपल्या अंतर्मनात आपल्या रोजच्या वागण्यात ते उतरविले पाहिजे. ज्ञान फक्त ऐकायचे नाही तर ते आपले आचार, विचार, चरित्र, व्यवहार आणि जीवनात उतरविल्यास आपण आपले ठरलेले लक्ष्य अगदी सहजतेने प्राप्त करू शकतो. व या काही गोष्टी जाणूनच आपण आपली मानसिकता मोठी होते म्हणून विद्या कोठूनही मिळो ती घेण्याचा प्रयत्न करत राहीला पाहिजे.
सुंदरता – सुंदरता म्हणजे काय? फक्त तुमचा चेहरा सुंदर असणे म्हणजेच सुंदर असणे असं नाही.. तर चेहऱ्याबरोबरच चरित्रही सुंदर असले पाहिजे. ज्या स्त्रीचा चेहरा, शरीर, चरित्र साफ, स्वच्छ आहे ती स्त्री आपल्या कुळाबरोबरच आपल्या नवऱ्याच्या कुळाचाही मान वाढवते. तसेच चरित्रवान स्त्री पत्नी म्हणून भेटल्याने त्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात, आणि अशी स्त्री आपल्या कुटुंबालाला कोणत्याही संकटातून बाहेर काढण्यासाठी सक्षम असते.
उपदेश – जर तुम्ही कुठे तरी जात असाल आणि कुणी संत किंवा महात्मा उपदेश देत असतील तर तुम्ही थोडा वेळ तिथे थांबण्यास संकोचू नका. संतांचा उपदेश तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवू शकतो. संतांच्या उपदेशातच लक्ष्मी प्राप्ती, परिवाराची संतुष्टी, व आपल्या जबाबदारीचे योग्य अहंसूत्र तुम्हाला मिळू शकतात. जेव्हा तुम्ही संत महातम्यांचे उपदेश ऐकाल तेव्हा तुमच्या समस्या देखील आपोआपच दूर होतील. म्हणून संत महात्मे यापैकी कुणाकडूनही उपदेश मिळत असेल, अध्यात्मिक शिकवण मिळत असेल तर ती विना संकोच घ्या.
पावित्र्य / शुद्धता – पावित्र्य या शब्दाचा संबंध केवळ शरीराशी येत नसतो तर आचार, विचार यांच्याशी संबंधित पण आहे. जोपर्यंत आपला व्यवहार आणि विचार पवित्र होत नाहीत तोपर्यंत जीवनात उन्नती नाही म्हणून जर तुम्हाला कोणतेही कठीण लक्ष प्राप्त करायचे असेल तर आपण आपले विचार शुद्ध ठेवायला पाहिजेत. त्याचसोबत चरित्र ही स्वच्छ ठेवले पाहिजे. जेव्हा आपले व्यवहार आणि मानसिकता पवित्र होईल तेव्हाच आपण आपले काम जबाबदारी ने करू शकतो व आपले लक्ष्य प्राप्त करू शकतो.
रत्न – रत्न जसे की हे अनेक प्रकारचे असतात जसे की मोती, माणिक, मुंगा, हिरा, पुष्कराज. यांची किंमत ही खुप असते, यातील काही रत्न ग्रहदोष कमी करून चांगले परिणाम देतात. हिरा सुद्धा एक अमुल्य रत्न आहे पण हे कोळशाच्या खाणीत मिळते त्याचप्रमाणे मोती आणि मुंगा हे समुद्रातून मिळतात. तस बघितलं तर कोळशाच्या खाणीत प्राप्त होणारे रत्न खुप किंमती असतात आणि आपण ते आभूषणांच्या स्वरूपात आपण धारण देखील करत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की रत्न कुठूनही मिळो ते घेण्यासाठी कधीच संकोचू नका.
धर्म – धर्म हा एक संस्कृत शब्द आहे, याचा अर्थ असा की धारण करणे. आपल्या धर्माचा अर्थ खूप विशाल आहे, म्हणून याला काही शब्दात स्पष्ट करणे सुद्धा अवघड आहे. धर्म आपल्याला काम जबाबदारीने करायला शिकवतो. दुसऱ्याची मदत करणे, आपले चरित्र स्वच्छ ठेवणे, आपल्या परिवाराचे पालन पोषण करणे आणि नेहमी खरे बोलणे हे धर्माचे स्वरूप आहे जिथे आपल्याला साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यासारखे सिद्धांत मिळतात. आणि ते ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेजला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news