सुख-समृद्धीसाठी घरात ‘या’ दिशेला ठेवा हनुमानाची मूर्ती, काय आहेत वास्तूचे नियम?

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सुख शांती लाभावी तसेच सुख-समृद्धी आपल्या घरामध्ये नादावी असे मनोमन वाटत असते. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, कोणतेही संकटांचा आपणाला सामना करावा लागू नये यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय देखील करतो. परंतु त्यांचा काहीच उपयोग न झाल्याने आपण उपाय देखील करणे सोडून देतो.
परंतु मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजेच आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्यानुसार जर तुम्ही त्या वस्तू ठेवल्या तर यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू शकते. कोणताही वास्तुदोष आपल्या घरामध्ये होत नाही.
मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये हनुमानाची मूर्ती असेल तर ही हनुमानाची मूर्ती नेमकी कोणत्या दिशेला ठेवावे याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्ही त्या योग्य दिशेला हनुमानाची मूर्ती जर ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू शकते. मित्रांनो, हिंदू धर्मात देव-देवता आणि पूजा-विधीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. घरात सुख-समृद्धीसाठी आपण रोज देवघरातल्या देवतांचं पूजन करतो. वास्तुशास्त्रात घरातील देवघर आणि देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवण्यासाठी काही नियम सांगितले गेले आहेत.
हिंदू धर्मात श्री हनुमान ही शक्तीची देवता मानली जाते. तसंच कलियुगात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणून श्री हनुमानाचं पूजन केलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घरात श्री हनुमानाची मूर्ती किंवा फोटो योग्य दिशेला असने खूपच गरजेचे आहे. ही दिशा नेमकी कोणती आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्मात भगवान हनुमानाला कलियुगातली देवता मानलं जातं. कारण हनुमान ही लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. त्यामुळे घरात श्री हनुमानाची मूर्ती ही ईशान्य दिशेला ठेवणं शुभ आणि लाभदायक मानलं जातं. तसंच बसलेल्या मुद्रेतल्या श्री हनुमानाची मूर्ती अथवा फोटो दक्षिण दिशेला लावणंदेखील खूपच शुभ मानलं जातं.
याशिवाय उत्तर दिशेलाही श्री हनुमानाची मूर्ती ठेवता येते. या दिशेला श्री हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ठेवला तर संबंधित व्यक्ती कोणत्याही संकटातून लवकर मुक्त होते. कोणत्याही संकटांचा सामना देखील करावा लागत नाही.मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरात दक्षिण दिशेला पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो लावला तर जीवनात सुख-समृद्धी आणि धनलाभ होतो. तसेच श्री हनुमानाचा पर्वत उचलतानाचा फोटो घरात लावने देखील शुभ मानलं जातं.
यामुळे संबंधित व्यक्ती कोणत्याही कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडते. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरातल्या ज्या दिशेला श्री हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ठेवला आहे, तेथील जागा रोज स्वच्छ कराव आणि पूजाविधी करणं आवश्यक आहे. ज्या घरात श्री हनुमानाची मूर्ती असते त्या घरातल्या नागरिकांनी दर मंगळवारी श्री हनुमानाची विधिवत पूजा आणि सुंदरकांडाचं पठण करणं हे शुभफलदायी मानलं जातं.
घरातल्या दक्षिणेकडच्या भिंतीवर लाल रंगाचा, बसलेल्या मुद्रेतल्या श्री हनुमानाचा फोटो लावला तर त्या दिशेकडून येणारी नकारात्मक ऊर्जा रोखली जाते. श्री हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती कधीही जिन्याखाली, किचन अर्थात स्वयंपाक घरात किंवा अपवित्र ठिकाणी ठेवू नये असे वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, श्री हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती बेडरूम अर्थात झोपण्याच्या खोलीत ठेवू नये. या खोलीत श्री हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ठेवला तर वास्तुदोष निर्माण होतो.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद