सुपारी तोडग्यामुळे गणपती बाप्पा होणार प्रसन्न, जाणून ज्योतिषशास्त्रीय उपाय..

हिंदू धर्मात देवी देवतांची पूजेसाठी वेगवेगळी पूजा सामग्री निश्चित आहे. यात सुपारीचं विशेष असं महत्त्व आहे. सुपारीत सर्व देवी देवतांचा वास असल्याचं धर्म शास्त्रात सांगितलं आहे. पूजनात एखाद्या देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर ब्राह्मण मंत्रोच्चाराने देवी देवतांचं आव्हान करतो. हिंदू शास्त्रात सुपारीला जिवंत देवाचं स्थान प्राप्त आहे.
सुपारी गणपती, देवी लक्ष्मी, ब्रह्मदेव, यमदेव, इंद्रदेव आणि वरुण देवाचं प्रतिक मानलं जातं. ग्रहशांतीत ग्रहांचं प्रतिक म्हणून सुपारी मांडली जाते. पूजा करताना पत्नी नसेल तर तिच्या जागेवर सुपारी स्थापन करून पूजेचं पूर्ण फळ मिळवलं जातं. सुपारीचं असं महत्त्व असून वास्तूदोष दूर करण्यास मदत होते. सुपारीच्या काही उपायांनी गणपती बाप्पांची कृपा मिळवू शकतो.
सुपारीचे ज्योतिषशास्त्रीय उपाय
सुपारीाल मोली बांधून भगवान गणेशाला अर्पित केल्यास त्यांची कृपा प्राप्त होते. तसेच काही अडचणीतून सुटका होते. अडकलेली कामं मार्गी लागतात. थोडं तूप घेऊन त्यात कुंकू टाकून मिश्रण तयार करा. त्यानंतर त्या तूप मिश्रित कुंकवाने विड्याच्या पानावर स्वास्तिक काढा. त्यानंतर सुपारीला मौली बांधून पानावर ठेवा. कामाच्या ठिकाणी ही सुपारी ठेवा. यामुळे उद्योग नोकरीत यश मिळतं.
पान सुपारीचं महत्त्व
पान सुपारी म्हणजेच विड्याचं महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, समुद्र मंथनावेळी देवांनी विड्याच्या पानाचा उपयोग केला होता. त्यामुळे मंगळ कार्यात पूजेत विड्याचा मान असतो. पान सुपारीमध्ये सकारात्मक उर्जेचा संचार असतो.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद