शनिवार विशेष स्वामी सेवा, जे हवं ते सर्व काही लाभेल, आज ही प्रभावी सेवा करा

श्री स्वामी समर्थ मित्रांनो अशक्य ही शक्य करतील स्वामी शनिवारची स्वामींची सेवा इच्छापूर्तीसाठी न क्की करा ही सेवा. आपण गुरूवारची सेवा बघितली शुक्रवार ची बघितली आता आपण शनिवारची स्वामी सेवा बघणार आहोत.
शनिवारची सेवा तुम्ही सकाळी संध्याकाळी या दोन्ही वेळेत करू शकतात. नेहमी प्रमाणे घरातल्या कोणत्या ही सदस्याने ही सेवा केली तरी या सेवेचा लाभ संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण घराला होत असतो. या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत. त्या तीन गोष्टी तुम्हाला तुमच्या देवघरा समोर बसून स्वामींच्या समोर बसुन करायच्या आहेत.
त्या तीन गोष्टींमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला एका मंत्राचा जप एक जपमाळ करायचा आहे. मित्रांनो हा मंत्र स्वामींच्या अष्ट नामावलीतील मंत्र आहे. आणि हा मंत्र काही असा आहे.. श्री अक्कलकोट स्वामी समर्थां चे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आय नमः या नामाचा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला एक माळ जप स्वामींच्या नामाचा जप करायचा आहे. जो की आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस भागवत गीतेचा पंधरावा अध्याय सुद्धा वाचायचा आहे. गीतेचा पंधरावा अध्याय स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पवित्र पोथी मध्ये दिलेला आहे तर तुम्ही तो तिथून वाचू शकतात.
आपल्याला फक्त या तीन गोष्टी मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करायच्या आहेत. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नामाचा एक माळ जप श्री स्वामी समर्थ या नामाचा एक माळ जप आणि गीतेचा पंधरावा अध्याय. तुम्हा ला एक वेळेस वाचायचा आहे. ही सेवा पवित्र सेवा तुम्ही नक्कीच करा. स्वामी प्रसन्न होतील.
आणि आपल्याला ही सेवा रोज नाही करायची ही फक्त शनिवारची सेवा आहे कारण रोजच्या रोज आपण अ शी दिवसानुसार सेवा केली तर त्याचा लाभ लगेच होतो आणि आपल्याला या सेवेचे अनुभव सुद्धा येतात. तसे च आपल्याला सेवेचे फळ देखील मिळतात. तर मित्रां नो तुम्हीही आजची ही सेवा करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.!!
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्या पर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news