स्वामी कसे आपल्या भक्तांच्या नशिबाचे फासे बदलतात ते नक्की वाचा.. डोळ्यात पाणी येईल. !!

मित्रांनो, सौ. जयश्री पांडुरंग विसपुते या स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव सांगितला आहे. तोच अनुभव आजच्या या लेखामध्ये त्यांच्याच शब्दात सांगणार आहे.
“मी सौ. जयश्री पांडुरंग विसपुते. मी माझा अनुभव तुम्हाला स्वामीभक्तांना सांगू इच्छिते. मी आज स्वामींकडे खूप रडले. कारण तब्बल आजच्या दिवसाला दहा वर्षांपूर्वीचे दिवाळीचे दिवस आठवले. माझ्या लग्न झाले तेव्हाचे दिवाळी माझी पहिली दिवाली. सर्वच मुली पहिल्या दिवाळीत खूप आनंदाने साडी, दागिने घालून आनंदी असतात. आईच्या घरी जातात. मज्जाच मज्जा करतात आणि अनेक चांगल्या तऱ्हेने दिवाळी साजरी करतात.
त्यावेळी आमची परिस्थिती अशी होती की साधा आम्ही फराळ सुद्धा करू शकत नव्हतो. साडी, ९ दागिने तर लांबच! पण आम्ही दोघं नवरा-बायको कोणाचा हे कधीच हेवा केला नाही. विशेष म्हणजे माझ्या पतीने होता. पैशासाठी मला कधीही कामाला पाठवले नाही. “देवा काळजी घे! स्वामी सेवा हीच खरी कमाई!” हे नेहमी मला ते सांगायचे. म्हणून फक्त स्वामी सेवा केली. तेव्हा लक्ष्मी पूजनाला फक्त खिचडी हा प्रसाद मी स्वामींना दिला होता.
स्वामी सेवाही सुरू होती. दिवस बदलत होते. काही काळानंतर मला प्रसूती झाली. तेव्हा ही परिस्थिती अशीच होती. स्वामिं शिवाय मला कोणीही मदतीचा हात दिला नाही. की कोणी आर्थिक मदत केली नाही. भक्तांनो ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे स्वामी असतात. डिलिव्हरीच्या वेळी सर्व मुलींसोबत बहीण, सासू, नणंद, भाऊ, वडील असतात. पण माझ्यासोबत फक्त आणि फक्त स्वामी शक्ती होती.
शेजारच्या ताई स्वामी रूपात माझ्या सोबत होत्या. कदाचित स्वामींनी त्यांना पाठवले होते आणि त्यामुळे माझी प्रसुती नॉर्मल झाली आणि मी अगदी पाचव्या दिवसापासूनच घर काम करायला लागले. पण स्वामींनी मला अजून पर्यंत अगदी करोनासुद्धा दवाखान्यात ऍडमिट व्हायची वेळ आली नाही. माझ्या मुलाचे पण पहिली दिवाळी आमच्या सारखीच!. दुकानातील सर्वात कमी दर्जाचे कमी किमतीचे कापड त्याला घेऊन दिले.
कारण आम्ही भारी कपडे घेऊ शकत नव्हतो. फक्त स्वामी नाम स्वामी सेवा सुरू होती. समाधानाने दिवाळी साजरी करत होतो व त्या हे दिवाळीला आम्ही बेसन पोळी स्वामींना प्रसाद म्हणून दिली. आणि हळूहळू परंतु गुरुमाऊली च्या आज्ञेनुसार श्री सत्यनारायण पूजा दिवाळीचे विषय सेवा वर्षभरात अनेक सेवा करत गेलो. मी हे कायम करत आहे. पण माझ्या डोळ्यातील अश्रु मात्र थांबत नाहीत.
कारण आमची परिस्थिती फक्त स्वामींना माहिती होती. आम्ही कोणाकडे कधी हक्काने काही मागितले नाही. कारण आता सांगायला इतका आनंद होतो की, आता आमचे स्वतःचे घर आहे. गाडी आहे. पतिला चांगल्या पदाची नोकरी आहे. आणि हे सर्व स्वामींच्या अखंड सेवेमुळे आम्हाला मिळाले आहे. हा स्वामी मार्ग मिळाल्यापासून स्वामींनी जणू काही सर्व कारभार व आमची काळजी त्यांच्या हाती आहे.
आमच्या जीवनात पाच दिवस नाही तर, रोजचे दिवाळी झाली आहे. आता स्वामींनी परिस्थिती खूप चांगली केली आहे. लग्नानंतर तीन वर्ष दिवाळीमध्ये केलेली स्वामी सेवा खूप काही शिकवून गेली. स्वामींनी माझ्या आयुष्यात ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती असं काही भरभरून दिले. स्वामी भक्तांनो तुम्हाला खोटं वाटेल पण एक एक दिवस आमच्यावर उपाशी राहायची वेळ यायची पण त्याही वेळेस स्वामी कुणाच्या कुणाच्या रुपात येऊन आम्हाला घास भरवायचे.
मी फक्त स्वामी माऊलीन वर विश्वास ठेवला होता. आज मला स्वामीं समोर खूप रडायला येतं. आयुष्यात दुःख आहे म्हणून नाही तर, माझी परिस्थिती काय होती आणि स्वामींनी काय केले हे सर्व पाहून!. स्वामींसमोर मी रोज एकदा तरी रडते. एकदा तरी माझ्या डोळ्यात स्वामींना पाहून पाणी येतं आणि मी मन भरुन रडून घेते. स्वामींसमोर रडल्याने मन हलकं होतं. मला असं वाटतं की, स्वामी सेवा माझी कुठेतरी कमी पडते. पण नक्की याचा शोध लावून मी अखंड मला मरण येईपर्यंत स्वामींची सेवा चालू ठेवणार आहे.
स्वामी भक्तांनो माझे स्वामी चरणी एकच प्रार्थना आहे. स्वामींचा आशीर्वाद असाच माझ्या सोबत आणि तुम्हा सर्वांसोबत कायम राहू दे!” अशा प्रकारे स्वामी तिच्या जीवनाला एक नवीन आकार दिला. स्वामीं आपल्या कोणताही भक्ताला संकटात एकट्याला सोडत नाहीत. ते आपल्याला पाठीशी कायम उभे असतात. फक्त आपण श्रद्धेने सेवा केली पाहिजे…
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news