स्वामी म्हणतात .. तू फक्त प्रयत्न कर, तुला कुठे घेऊन जायचं हे मी ठरवतो..आणि कर्मावर भरोसा ठेव..

श्री स्वामी समर्थ,नमस्कार मंडळी, आपण प्रत्येक जण काहीना काही ध्येय ठेऊन ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. पण अनेकदा काय होईल हेच कळत नाही. त्यामुळे आपण नेहमीच भीतीदायक वातावरणामध्ये जगत असतो. आपण वारंवार स्वामींच्या जवळ जातो. त्यांना नेहमी विचारत असतो.
पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की, तुम्ही जर मनोभावे श्रद्धा ठेवत असाल तर तुम्हाला समस्या वर आपोआप मार्ग सापडतात.अनेकदा असे झाले असेल की एखादा अनोळखी व्यक्ती देखील तुमच्या संकटात मदत करून जातो. याला तुमच्या कर्माची पुण्याई म्हणतात.
तुम्ही जगात वावरत असताना असे वावरले पाहिजे की तुमच्या चांगल्या कर्माची वाढ झाली पाहिजे. कारण तुम्ही जे कर्म कराल तेच फळ मिळते. त्यामुळे चांगले कर्म केलं पाहिजे. तसेच दुसऱ्याचं वाईट चिंताल तर तुमचंही वाईट होईल. त्यामुळे चांगलं चिंतलं पाहिजे.
आपण स्वामींच्या मठात जातो. समस्या विचारतो. पण आपल्याला मनात भीती असते. पण तुम्ही घाबरू नका. स्वामी म्हणतात तुम्ही मनःपूर्वक शरण या, मी तुमच्या संकटात तुमचं रक्षण केल्या शिवाय राहणार नाही. याचा अनुभव देखील आपल्याला आलाच असेल.
तुम्ही जे काम करत असाल ते योग्य व प्रामाणिकपणे करा. स्वामी ठरवतील काय द्यायचं काय नाही. स्वामी तुम्हाला चारचाकी गाडी देणार असतील व तुम्ही दुचाकी मागत असाल तर नुकसान तुमचं आहे. चूक तुमची आहे.
म्हणून स्वामींच्याकडे मागताना स्वामींना जे द्यायचं ते द्या अशी प्रार्थना करा.कारण आपण अज्ञानी आहोत. त्यामुळे स्वामी योग्य देतील हा विश्वास मनात ठेवा. त्यामुळे थोडा वेळ लागेल पण जीवनाचं कल्याण होईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद