स्वामी म्हणतात तू केवळ निमित्त आहेस, मी हे जग चालवतो, त्यामुळे अहंकार करू नको, गर्वाचे घर नेहमी खाली असते..

स्वामी महाराजांच्या लील अगाध आहेत. स्वामी जिथे संकट येते तेथे आपल्याला तारतात. स्वामी नावाची शक्ती आपल्याला प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी तारत असते. आपण स्वामींची अपार श्रद्धा करतो केंद्रामध्ये जातो. मात्र कधी कधी आपला अहंकार वाढतो त्यावेळी स्वामी म्हणतात, अहंकार बाळगू नकोस कारण हे जग मी चालवतो; तू फक्त निमित्त मात्र आहेस. तू कोणत्याही कामाचं श्रेय घेऊ नकोस, ज्याच्या श्रेय त्याला द्यायला शिक, तरच तू अहंकार मुक्त होशील.
यावर एक कथा आपण बघू. एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता. तो खूप धनवान होता. त्याच्याकडे बक्कळ पैसा होता. मात्र तो नेहमीच अहंकारी वृत्तीने वागत होता. एके दिवशी एक आजी त्याच्या घरासमोर आली व दार वाजवू लागली. दार उघडले असता,
ती आजी म्हणू लागली की माझ्या मुलाला दवाखान्यासाठी पैसे हवे आहेत, मला मदत करावीहे ऐकून व्यापारी मदत करण्याऐवजी माझी आपली ओळख नसून, मी कशी आपल्याला मदत करू, म्हणून त्या आजीला जाण्यास सांगितले. ती आजी निमूटपणे निघून गेली. असेच काही दिवस उलटले तोपर्यंत व्यापारी आपल्या गाडीने जंगलातून येत होता. यावेळी त्याची गाडी बंद पडली.
रात्रीची वेळ असल्याने जंगलात राहणे बरे नाही म्हणून तो जागा शोधू लागला. त्यावेळी त्याला एक झोपडी दिसली. या झोपडीमध्ये एक म्हातारी आणि एक मुलगा त्याला दिसला. त्यांनी झोपडीत राहण्याची विनंती केली. त्यावेळी त्यानी त्याला झोपडीत राहण्यास जागा दिली.
एवढेच नाही तर त्याला समोर जेवणाचे ताट दिले, व झोपण्यास अंथरून पांघरून दिले. ज्यावेळी सकाळ झाली तो व्यापारी जाऊ लागला त्यावेळी त्या व्यापाऱ्याने त्या आजीला ओळखले. आपल्याकडे मदत मागण्यासाठी आली होती तीच ही आजी आहे. हे पाहताच त्याच्या अंगावर शहारे आले.
त्यावेळी तो खूप खजिल झाला व त्याने आजीची माफी मागितली व त्यांना आपण मदत करण्याचे सांगितले. मात्र यावेळी आजीने नकार दिला. व म्हणली, यापुढे कधीच कोणाला मदत करताना हा विचार करू नको, की ती व्यक्ती कोण आहे,असे सांगून त्यांना नमस्कार केला. यातून हाच बोध घ्यायचा आहे की, आपण एखाद्याला मदत करताना हा विचार करा की आपल्याला मदत करण्याची संधी मिळाली आहे.
त्या संधीचा फायदा घ्या, जेणेकरून त्या मदतीमुळे तुमच्या जीवनातील दुःख किंवा जे भोग असतील ते कमी होण्यास मदत होईल. कोणतीही मदत केल्यानंतर अहंकार बाळगू नका, कारण अहंकार बाळगल्यानंतर त्याचा शेवट नक्कीच होतो. म्हणून म्हटले जाते अहंकाराचे घर नेहमीच खाली असते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद