स्वामी तुम्हाला स्वप्नात दिसतात का.?

प्रत्येकाला स्वप्न पाहण्याची सवय असते. कधी कधी कोणाला चांगली स्वप्न पडतात तर कधी कधी कोणाला वाईट स्वप्न पडतात.काहीजण हे स्वप्न बघितल्यानंतर विसरून जातात तर काही जणांच्या स्वप्न आहे तसेच लक्षात राहते. तर काहीजणांना एखादी गोष्ट घडल्या नंतर कळते की आपण ही गोष्ट स्वप्नात बघितली होती.
स्वप्नामागे काहीतरी खास गोष्ट भरलेली असते. ही स्वप्न पडण्यामध्ये काहीतरी विशेष संकेत असतात या संकेताची माहिती आपल्याला नसते मात्र ही स्वप्न आपल्या आयुष्यात अनेक संकेत देत असतात. कधी कधी स्वप्नात बघितलेले प्रत्यक्ष आयुष्यात उतरताना दिसते मात्र आपण स्वप्न पडल्यानंतर याचा विचार कधी करत नाही. आपण या भागात अशाच रंजक स्वप्नांचा मागोवा घेणार आहोत.
तसेच कोणत्या स्वप्नांचा काय अर्थ असतो हे बघणार आहोत.ज्योतिष शास्त्रामध्ये स्वप्नांना विशेष महत्त्व आहे. स्वप्न पडण्याचा ज्योतिष शास्त्रात एक वेगळाच भाग आहे. स्वप्न पडण्याचे काही शुभ संकेत असतात तर काही अशुभ असतात. त्यातील कोणकोणते शुभ संकेत आहेत कोणकोणते अशुभ संकेत आहेत हे आपण आता बघणार आहोत.
जर तुमच्या स्वप्नात जमिनीत पुरलेले पैशाने भरलेले मडके दिसत असले तर तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. असा त्याचा अर्थ होतो. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार असून तुम्हाला धनलाभ होणार असल्याचे संकेत यामधून मिळत असतात. आई लक्ष्मी मातेच्या हातामध्ये नेहमीच आपण बघतो की पैशाने भरलेले पात्र किंवा पैशाने भरलेले एखादे मडके असते, त्यामुळे पैशाने भरलेले मडके स्वप्नात बघणे हे एक शुभ संकेत मानले जातात.
तुमच्या व्यवसायात भरभराट होऊ शकते, किंवा तुमच्या नोकरीमध्येही तुम्हाला उच्च पद मिळू शकते व त्यात द्वारे तुम्हाला धन मिळू शकते असे संकेत यामध्ये मिळतात. जर तुम्ही स्वप्नामध्ये पाऊस पडताना पाहिलं असेल तर हेही तुमच्या करिअरच्या दृष्टीने मार्गक्रमण करण्याचे व तुमच्या करिअर साठी चांगले दिवस येण्याचे संकेत आहेत.
या स्वप्नाद्वारे तुम्हाला असे सूचित केले जाते की तुम्हाला भविष्यात तुमच्याकडे पैसा आकर्षित होणारआहे. तुमच्याकडे पैसे येणार आहेत.त्यामुळे तुम्ही जे काय करिअरसाठी प्रयत्न करत आहात ते चालू ठेवावेत जेणेकरून त्याद्वारे खूप पैसा तुमच्याकडे येणार आहे. महापूर किंवा पूर नेहमीच नुकसान करत असतो एका रात्रीत होत्याचं नव्हतं करतो. मात्र स्वप्नामध्ये महापूर पाहणे किंवा पूर पाहणे हे शुभ संकेत मानले जातात.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये पूर परिस्थिती दिसली असेल तर समजा की नक्कीच तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार आहे. तसेच तुम्ही स्वप्नामध्ये एखादे घाण पाणी बघत असाल तर तेही शुभ मानले जाते आहे. तुमच्या दृष्टीने शुभ संकेत मानला जातो.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये तुम्ही हवेत उडताना दिसत असाल तर तुमच्या दृष्टीने हा संकेत धोकादायक ठरू शकतो. जर अशा प्रकारचे स्वप्न आपल्याला पडत असेल तर तुम्ही कोणती गोष्ट करताना थोडं जपून करणे आवश्यक आहे. वाहन चालवताना तुम्ही जपून वाहन चालणे आवश्यक आहे. किंवा एखादे गुंतागुंतीचे काम करताना इलेक्ट्रिकचे काम करताना तुम्ही सावध पूर्ण करणे गरजेचे आहे.
त्यामुळे अशा प्रकारचा संकेत मिळताच किंवा स्वप्न पडतात तुम्ही सावधानतेने काम करा हा इशारा या स्वप्नामधून तुम्हाला मिळालेला असतो.तुम्ही जर सतत स्वामींची भक्ती करत असाल, स्वामींच्या विचारांशी एकरूप होत असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच स्वप्नामध्ये दर्शन देतात.
जर स्वामींचे दर्शन तुम्हाला होत असेल तर समजून जा तुम्ही भाग्यवान आहात आणि तुम्ही करत असलेली गोष्ट योग्य आहे. त्यामुळे जर स्वामी तुम्हाला स्वप्नात येऊन आशीर्वाद देत असतील तर तुम्ही खूप नशीबवान आहात. श्रीस्वामी समर्थ..
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद