स्वामी म्हणतात, अरे भिऊ नकोस , तुझे भाग्य उजळले , तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे..

बसप्पा नावाचा अनन्य भक्त स्वामींची अनन्य सेवा करत असत जिथे जिथे स्वामी तिथे तिथे बसप्पा गृहस्थाश्रमी होता. घरातील परिस्थिती नाजूक होती .पण स्वामी भक्तीचे त्याला इतके वेड लागले कि त्याचे घराकडे लक्षच नव्हते. स्वामी सहवासात भरपूर ज्ञान स्वामीनी बसाप्पा ला दिले. त्याने पुन्हा प्रपंचात लक्ष द्यावे आणि स्थयिक व्हावे हे स्वामींच्या मनात यायला लागले. ह्या तूनच एकदा फक्त बसाप्पा आणि स्वामी रात्री जंगलातून जात असतां ना अचानक सर्प प्रगट झाले हे सर्व बघून बसप्पा घाबरला तेव्हा स्वामी त्याला बोलले “ अरे, भितोस कशाला, तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे
बसप्पा च्या काही लक्षात आले नाही पण स्वामी प्रती अनन्य भक्ती इतक्या उंचीवरची होती कि त्याने नि:शंक मनाने त्यातील काही सर्प झोळीत घेतले आणि घरी आले .घरी आल्या नंतर जेव्हा बसाप्पाने झोळी बघितली तेव्हा त्या सर्पाचे सोने झालेले बघितले आणि आश्चर्याने स्वामी नामात नाचू लागला..
बोध — स्वामी भक्तीत राहिल्याने..स्वामींवर अतूट विश्वास ठेवल्याने स्वामी सापाचे (संकटांचे ) सोने (कृपा) करतात हा ह्या लीलेतून स्वामींचा संदेश होता..थोडक्यात ज्याचे स्वामींवर अनन्य भक्ती आहे त्यांनी संकटाना (सापाला) घाबरू नका कारण पुढे त्याचे सोनेच होणार आहे अशी स्वामी वाणी आहे .. धन्यवाद स्वामी ! कोटी कोटी धन्यवाद
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली कनेक्टेड मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news