स्वामी म्हणतात या मार्गाने जा तू नक्कीच श्रीमंत होशील… श्रीमंत होण्याचा जालीम उपाय..

श्री स्वामी समर्थ, नमस्कार मित्रांनो, या जगात प्रत्येकाला सुख पाहिजे प्रत्येक जण सुखाच्या मागे धावतो. प्रत्येकाला पैसा हवा आहे, गाड्या हव्या, बंगला हवा आहे. मात्र कष्ट करायला नको अशी प्रवृत्ती आढळून येते. पण कष्ट केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही हे त्रिवार सत्य आहे.
कष्टाला आशीर्वादाची जोड मिळाल्यास त्या व्यक्तीला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. त्यामुळे कष्टा बरोबर आशीर्वाद असणे गरजेचे आहे. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जो कष्ट करणार नाही त्याला कोणतीच गोष्ट प्राप्त होणार नाही.
एकदा एक व्यक्ती खूप तपश्चर्या करत बसलेलेला असतो.त्यावेळी त्याला देव प्रसन्न होतात. त्यावेळी त्याची तपश्चर्या बघून ते त्याच्यावर प्रसन्न होतात व त्याला म्हणतात तुला जे हवे ते मग मी तुला देईल.
तो त्यावेळी देवाला,मला लॉटरी लागू दे अशी विनवणी करतो. यावेळी देव तथास्तु म्हणाले आणि तिथून निघून गेले. यानंतर पुन्हा आठ दिवस झाल्यानंतर तो माणूस देवाला शिव्या देऊ लागला. काहीही बोलू लागला. यावेळी देव तिथूनच जात होते.
त्यावेळी देवांनाही ही गोष्ट लक्षात आली. देव त्याच्या जवळ आले आणि म्हणाले, मागच्या वेळी तर तू माझी प्रशंसा करत होतास आता तर शिव्या देत आहेत असं का? यावर तो व्यक्ती म्हणाला तुम्ही देव आहात, तुम्ही कधी खोटे बोलत नाहीत. मात्र तुम्ही मला आशीर्वाद दिला की तुला लॉटरी लागेल म्हणून, मात्र आठ दिवस झाले मला लॉटरी लागली नाही.
यावर देव हसले आणि म्हणाले, तुला लॉटरी लागण्यासाठी लॉटरीचे तिकीट खरेदी करावे लागणार होते. तू ते केलेच नाहीस. मग तुला लॉटरी लागणार तरी कशी? यातून हाच बोध घ्यायचा आहे की; आपण देवाकडे कोणतीही गोष्ट मागताना तुम्ही कष्ट केले तर त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकता.
जर तुम्हाला एखाद्या गावाला जायचे असेल आणि तुम्ही देवाकडे प्रार्थना केली, पण जर तुम्ही बस मध्ये बसला नाहीत तर तुम्ही त्या ठिकाणापर्यंत पोहोचणार नाही. त्याप्रमाणे तुम्ही देवाकडे जी गोष्ट मागाल ती पूर्ण होईल. मात्र त्यासाठी तुम्हाला कष्ट करण्याची तयारी पाहिजे.
कारण “असेल हरी तर देईल खाटल्यावरी” असं कधी होणार नाही. तुम्ही जर कष्ट केले तरच ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होते, अन्यथा प्राप्त होणार नाही. त्यामुळे आयुष्यात कष्ट ही महत्त्वाची गोष्ट आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद