तृतीयपंथीय टाळ्या का वाजवतात? नैसर्गिकरीत्या आपोआप त्यांना टाळ्या वाजवण्याची इच्छा होते का?

तृतीयपंथीय टाळी म्हणजे नुसती टाळी नसून त्यांचे जीवन आहे. तृतीयपंथीयांचा असा दावा आहे की त्यांच्या समुदायातील सदस्यांप्रमाणे इतर कोणीही अशाप्रकारे टाळ्या वाजवू शकत नाही. सामान्य लोकही अशा टाळ्या वाजवत नाहीत.तृतीयपंथीयांची टाळ्या वाजवण्याची आपली एक खास पद्धत असते.
तसं बघितलं तर आपणही अनेक प्रसंगी टाळ्या वाजवतो. कधी कोणाच्या अभिनंदनासाठी/कौतुक करण्यासाठी तर कधी एखाद्याला प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला जातो. पण, आपल्या टाळ्यांचा आवाज हा तृतीयपंथीयांच्या टाळ्यांच्या आवाजापेक्षा वेगळाच असतो.सहसा मार्केट, ट्रेन, लग्न समारंभ, काही सण किंवा अन्य काही कार्यक्रम असतील तर तृतीयपंथीय अचानक लोकांपुढे येऊन पैसे मागतात.
पैसे दिल्यावर टाळ्या वाजवून डोक्यावर हात ठेवतात आणि आशीर्वादही देतात. कधीकधी बोलताना राग आल्यावर/भांडणाच्या वेळी अथवा आनंद व्यक्त करायचा असेल तरी टाळ्या वाजवल्या जातात.तृतीयपंथीयांचे आशीर्वाद आणि शाप खरे होतात, अशीही अनेकांची श्रध्दा असते.
तृतीयपंथीयांच्या म्हणण्यानुसार ते प्रत्येक प्रसंगी टाळ्या वाजवतात. यावेळी ते आपल्या खास शैलीत टाळ्या वाजवतात. अशाप्रकारे टाळी वाजवणे; ही त्यांच्या समुदायाची ओळख असते, असं मानलं जातं. ते विनाकारण टाळ्या वाजवत नाहीत.
तर टाळ्यांच्या माध्यमातून तृतीयपंथीय आपल्या भावनांचं प्रदर्शन करत असतात. ह्या टाळ्यांच्या खास शैलीचा त्यांची स्वतःची ओळख पटवण्याशी अगदी जवळचा संबंध आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद