तुझी इच्छा पूर्ण होईल विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.!! मित्रांनो, स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करत असतात. स्वामींच्या सेवेत श्रद्धा आणि भाव असला तर स्वामी तुमची प्रत्येक संकटात मदत करतील. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एका सेवेकरीचा अनुभव सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात.
माझी सर्वात मोठी मुलगी विवाह योग्य होती त्या वेळेचा हा अनुभव मी आपल्यापुढे मांडत आहे. मुलीसाठी सुयोग्य अशा वराच्या शोधात आम्ही होतो महाराजांच्या कृपाशीर्वादाने तिचा विवाह योग अचानक जुळवन आला. मुलाकडील मंडळीही सुदैवाने सेवेकरी मिळाली. दोन्हीही पक्षांकडून तातडीने विवाह करण्याचे ठरले. विवाह सोहळ्याची तयारीसाठी अवघा बारा दिवसांचा कालावधी शिल्लक होता.
एवढ्या कमी कालावधीत रजे अभावी आर्थिक तरतूद करणे मला शक्य नव्हते. परंतु जवळच्या नातेवाईकांनी आर्थिक मदत करण्याचे मान्य केल्याने मनावरचे दर्पण बऱ्याच अशी कमी झाले. तातडीने थोड्या लग्न पत्रिका छापून दूर अंतरावरच्या नातेवाईकांना फोनवर निमंत्रण देण्याचे ठरले. पत्रिका छापून घरी आणल्यावर कुलदेवता कुलदेवी ग्रामदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व गुरुमाऊली यांच्या पत्रिका प्रथम लिहून ठेवल्या.
सेवा केंद्रात पहिली पत्रिका स्वामी चरणी अर्पण करून दुसऱ्या दिवशी मी व माझा पुतणे दिंडोरी येथे माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी दुचाकीने निघालो. अक्कलगावहून तळेगाव मार्गे निघालो असता एकलहरा फाटा येथे उड्डाणपूलाच्या थोड्या अलीकडे आम्ही पोहोचलो होतो. याच ठिकाणी नाशिक कडे जाणाऱ्या एका मोठ्या कंटेनरला आम्ही ओव्हरटेक करून पुढे जाणार होतो आमच्या दुचाकीचा ही वेग साधारणच होता.
जवळ जवळ अर्ध कंटेनर आम्ही पास झालो परंतु अचानक चौपदरी रस्ता सुरू झाल्याने रस्ता दुभाजक सुरू झाले त्यामुळे दुभाजक व कंटेनरच्या मधोमध आमची गाडी अडकली पुढे काय झाले. आम्हाला समजले नाही साधारण पाच ते सात मिनिटे आम्ही सुद्धा अवस्थेतच होतो शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या शेजारी आमची गाडी पूर्ण डॅमेज अवस्थेत पडली होती.
माझ्या पुतण्याला कोणीतरी रस्त्याच्या कडेला झाडाखाली नेऊन ठेवले होते त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले होते मला शरीराचे कुठलीच जाणीव होत नव्हती फक्त डोळ्यांनी दिसत होते. माझ्या शेजारी दोन माणसे होते. त्यापैकी एक वॉचमन होता व तो ड्युटीवर जाण्याविषयी दुसऱ्याशी बोलत होता परंतु आमची अवस्था बघून त्यांनी ड्युटीवर जाण्याचे रद्द करून आमचे सेवा केली. माझ्या डोक्याला जबर मार लागला होता
शुद्धीवर आल्यावर माझे फक्त हात जोडले गेले अर्धवटपणे ते ही माउलींना अभिवादन करण्यासाठी नंतर थोड्या वेळाने माझे शरीरात थोडी चेतना आल्यावर त्या वॉचमनने आमचे रक्त पुसले, पाणी व चहा पाजला तेव्हा वॉचमनच्या रूपात स्वामी महाराज आमची काळजी घेत होते.
थोड्यावेळाने मी त्या वॉच मला माझ्या सातपूर येथील नातेवाईकांना फोन करण्यास सांगितले. पुढील अर्ध्या तासात नाशिकच्या सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये आम्हाला ॲडमिट करण्यात आले होते. प्लास्टर करून इतर उपचार झाले. माझे एक्स रे सिटी स्कॅन झाले. दोन तासांनी माझे रिपोर्ट आले रिपोर्ट बघून डॉक्टर म्हणाले, “अशा परिस्थितीत माणूस आयुष्यभर कोमात राहू शकतो परंतु आपण भाग्यवान आहात.
कारण आपले सर्व रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत.” आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेत असल्यामुळे सुखरूप परत आलो याची जाणीव झाली. तसेच स्वामी महाराजांनी साक्षात यमाच्या पाशातूनच आमची सुटका केली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत आमच्या हातून स्वामी कार्य घडो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद