तुळस नेहमी हिरवीगार आणि डेरेदार राहण्यासाठी प्रत्येक गृहिणीने हे एक काम कराव

आपल्या हिं दू संस्कृतीत तुळशीची नित्य नियमाने पूजा अर्चा, पाणी घालणे हे सर्व केले जाते. प्रत्येकाच्या घरी एक तरी तुळस लावलेली असते. खेडेगावात तर तुळशी वृंदावन असते. शहरात जागेच्या अभावी ते पाहायला मिळत नाही. तुळशीची नित्य नियमाने पूजा अर्चा, पाणी घालणे हे सर्व केले जाते. परंतु असे करुनही तुळस लव कर वाढत नाही. काहींची तुळस तर लवकर सुकून जाते. बऱ्याचदा तुळशीची पाने मोठीच होत नाहीत छोटीच राहतात.
तुळस लावण्यासाठी घर खूप मोठं असण्याची गरज नाही. स्वयंपाकघराच्या खिडकीतल्या छोट्याशा कोपर्या तही तुळस छान वाढते, बहरते. मुळातच तुळस वाढण्या साठी, बहरण्यासाठी खूप पाणी, प्रकाश आणि हवेची गरजच नसते. चांगली बहरेल असं वाटत असतानाच तुळस अचानक वठते, सुकते. कारण काही समजतच नाही. पण म्हणून तुळस पुन्हा बहरणारच नाही असं नाही. तुळस बहरण्यासाठीचे उपाय अगदीच आपल्या आवाक्यातले आणि सहज जमणारे आहेत. खत-मातीची फारशी उठाठेव न करताही वाळलेली तुळस पुन्हा हिरवीगार होवून चांगली बहरते.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुळशीवर ज्या मंजुळा असते ते सुकण्याच्या आतच तुम्हाला ते काढायचे आहे. सुकून गेल्यावर ते गळून पडतात आणि तुळशीला हानी पोहोचवतात. म्हणून लक्षात असुद्या कि बियांना सुकण्या आधीच काढायचे आहे. तुळशीला रोज खूप पाणी घात ल्यानेही तुळशीची पानं गळतात आणि रोप सुकतं. तुळशीवर पांढरी बुरशी आली की संपुर्ण रोप खराब होतं, सुकतं. तुळशीवरच्या या बुरशी संसर्गावर कडुलिंबाची पेंड हा उत्तम उपाय आहे. तुळशीजवळ दिवा आणि अगरबत्ती लावल्यानेही तुळस सुकते, जळते.
तुळस जर वाढत नसेल तर रोज रोज पाणी घालू नका. जेव्हा माती सुकलेली दिसेल तेव्हाच पाणी घाला. जास्त पाणी घातल्याने तुळशीची मुळ ओली राहून सडतात. त्यामुळे तुळशीची वाढ पूर्ण पणे थांबते. चांगली बहरेल असं वाटत असतानाच तुळस अचानक वठते, सुकते. कारण काही समजतच नाही. पण म्हणून तुळस पुन्हा बहरणारच नाही असं नाही. तुळस बहरण्यासाठीचे उपाय अगदीच आपल्या आवाक्यातले आणि सहज जमणारे आहेत. ते कोणते?
तुळस हिरवीगर आणि डेरेदार होण्यासाठी – तुळशीला रोज पाणी घातल्यानेही तुळशीची पानं गळतात आणि रोप सुकतं. अती ओलावा तुळशीसाठी योग्य नसतो. अशा वेळेस तुळशीच्या कुंडीतील माती उकरावी. वरची ओली माती काढून टाकावी. कोरडी माती आणि थोडी वाळू घालावी. यामुळे कोंडला गेलेला तुळशीचा श्वास मोकळा होवून तुळस पुन्हा श्वास घेवू लागेल.
तुळस अनेक कारणांमुळे सुकते. पण ती पुन्हा हिरवीगार करणं खूपच सोपं आहे. यासाठी कडुलिंबाच्या पानांची पावडर तुळशीला घालावी. यासाठी कडुलिंबाची पानं उन्हात वाळवून घ्यावीत. ती सुकली की मिक्सरमधे वाटून घ्यावी. केवळ दोन चमचे कडुलिंबाची पावडर तुळशीला घालावी. कडुलिंबाची पावडर तुळशीला घालताना माती थोडी उकरावी आणि मग ही पावडर घालावी. कडुलिंबाची पावडर घातल्यानंतर काही दिवसातच तुळशीला हिरवीगार पानं फुटलेली दिसतील.
तुळशीवर पांढरी बुरशी आली की अख्खं रोप खराब होतं, सुकतं. तुळशीवरच्या या बुरशी संसर्गावर कडुलिंबाची पेंड हा उत्तम उपाय आहे. ही कडुलिंबाची पेंड ही कडुलिंबाच्या बियांपासून बनवतात. हा उपाय सेंदिय खत आणि किड नियंत्रणात मोडतो. कडुलिंबाची पेंड कोणत्याही रोपवाटिकेत ( नर्सरी) उपलब्ध असते. ती नीम पेंड तुळशीच्या कुंडीतील मातीत मिसळली की काही दिवसातच तुळशीवरचा बुरशी संसर्ग निघून जातो.
जर कडुलिंबाची पेंड मिळाली नाही तर कडुलिंबाची 20 -25 पानं घ्यावीत. ती एक लिटर पाण्यात भरपूर उकळावी. पाणी गार झाल्यावर त्यातील पानं काढून टाकावी आणि हे पाणी एका बाटलीत भरुन ठेवावं. दर पंधरा दिवसांनी कुंडीतील माती उकरुन त्यात दोन चमचे कडुलिंबाच्या पानांचं पाणी घालावं. यामुळे तुळशीला बुरशी लागत नाही.
इतर महत्वाच्या टिप्स – तुळस डेरेरदार व्हावी यासाठी नक्की कोणत्या गोष्टीचा वापर करायचा आहे. इप्सम मिठाचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. हो इप्सम मीठ हे तुळस वाढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. त्याचा वापर दोन पद्धतीने करू शकतो. मीठ पाण्यात मिसळून ते पाणी तुळशीच्या पानांवर स्प्रे करू शकता.
किंवा एक चमचा इप्सम मीठ घेऊन ते खोडाला किंवा मातीत सोडू शकतो. लक्षात ठेवा स्प्रे करत असाल तर एक लिटर पाण्यात एक चमचा इप्सम मीठ घ्यायचे आहे. जास्त घ्याल तर पाने पिवळी पडून जाळून जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पाण्यात मीठ मिक्स झाल्यानंतर पाच मिनिटांने स्प्रे करू शकता.
लक्षात असुद्या जर तुम्ही तुळशीची पाने नित्यनियमाने खात असाल तर पानांवर स्प्रे करू नका, डायरेक्ट माती मध्ये मीठ सोडा. दोन ते तीन दिवसांतच तुम्हाला फरक उघड्या डोळ्यांनी दिसेल. तुळशीजवळ दिवा आणि अगरबत्ती लावल्यानेही तुळस सुकते, जळते. त्यामुळे तुळशीजवळ दिवा आणि अगरबत्ती ठेवू नये. तुळशीपा सून ते दूर ठेवावे. तसेच तुळस आरोग्यदायी असते म्हणून तिची पानं तोडून खाल्ली जातात. यामुळेही तुळस वठते. म्हणून तुळशीची पानं कधीही तोडू नये. तुमच्याही तुळशीची वाढ थांबली असेल तर एकदा नक्कीच वरील उपाय करून पहा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news