अध्यात्मिक

तुळशीची फक्त 11 पाने गुपचूप या पिठात टाका, घरात भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही…

मित्रांनो हे कलियुग आहे. या कलियुगात पैशाला अत्यं त महत्त्व आहे. ज्या माणसाजवळ पैसा आहे त्याला प्रसिद्धी आहे. त्याला समाजात मान आहे. अशा व्यक्तीचे लोक स्तुती प्रशंसा ही करतात. तुम्ही गरीब असाल तर तुमच्या घरातील जवळचे लोकसुद्धा तुमची निंदा करतात तुम्हाला कमी लेखतात.

आणि म्हणूनच की काय या कलियुगात प्रत्येक जण पैशांच्या मागे धावू लागलाय. असतील शिते तर जमतील भूते ही जुनी पण आपल्याला माहीतच आहे. या म्हणीचा अर्थ असा की जोवर लोकांना तुमच्याकडून फायदा आहे तोवर ते तुमच्याशी गोड बोलतील, तुमची प्रसंशा करतील तुमची विचारपूस करतील. मात्र ज्यावेळी तुमच्याकडून त्यांना फायदा नसेल त्यावेळेस ते तुमच्या कडे ढुंकूनही बघणार नाहीत तुम्हाला विचारणार नाही नाहीत.

धन ऐश्वर्य प्राप्तीसाठी ज्योतिषशास्त्रातील काही उपाय आपण बघणार आहोत. खरतर हे उपाय लाखो लोकांनी केलेले आहेत आणि त्याचा फायदा देखील अनेक लोकांना झालेला आहे. मात्र हा उपाय आम्ही केलेला आहे हे सांगण्यास लोक धजावत नाहीत.

ज्योतिष शास्त्राचे वैशिष्ट्य आहे कोणाही व्यक्तीस तुम्ही जेव्हा सांगतात हा उपास आम्ही केला आहे तर त्याचा जो प्रभाव असतो तो तात्काळ नष्ट होतो. आणि म्हणूनच हे उपाय बऱ्याचदा गुपचूप गुप्तपणे करा असं सांगितलं जातं.मित्रांनो हा उपाय अत्यंत सरळ साधा सोपा असून आर्थिक वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य असेल तरीही तुम्ही हा उपाय करावा. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय नियमितपणे करावा. एक दोन वेळेस करून सोडून देऊ नये. हा उपाय करण्यास तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही.उपाय असा आहे की आर्थिक वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनिवारी धान्य दळून आणावे.

म्हणजे धान्य दळून आणण्यासाठी चा वार आपण निश्चित करत आहोत तो म्हणजे शनिवार फक्त शनिवार. अनेक जणांना प्रश्न पडेल की अशा प्रकारचे उपाय केल्याने खरोखर फायदा होईल काय? ज्यांना फायदा झाला आहे ते लोक सांगत नाहीत म्हणून तुम्हाला विश्वास बसत नाही.

तुम्ही स्वतः हा उपाय करून अनुभव घ्या. इथून पुढे इतर कोणत्याही दिवशी आपण धान्य दळून आणणार नाही फक्त शनिवारीच धान्य दळून आणणार आहोत.धान्य दळून आणताना ते धान्य गहू असेल तर या गव्हात मध्ये आपण तीन वस्तू टाकायचा आहेत.

पहिली वस्तू आहे काळे हरभरे काळे चणे. देवाची पूजा करण्याचे सामान जिथे मिळते तिथेच हे काळे चणे देखील मिळतील. साधारण शंभर ग्राम चणे आपण हे या गव्हात टाकायचे आहे. सोबत 11 तुळशीची पाने आपण त्यात टाकायची आहेत.मित्रांनो ही पाने स्वच्छ धुऊन आपण त्यात टाकायची आहेत.

ही पान तोडताना तुळशीच्या रोपट्या स कोणतीही इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पाने तोडताना तुळशी मातेचे मनोभावे पूजा करावी आपल्या मनातील धनप्राप्तीची इच्छा बोलावी.

तिसरी वस्तू आहे दोन केशर च्या काड्या. या तीनही वस्तू गव्हामध्ये निट मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर असे गहू शनिवारच्या दिवशी आपण दळून आणायचे आहेत. इथून पुढे शनिवार वगळता कोणत्याही दिवशी दळण आणू नका. हा उपाय सतत करून पहा. अनुभव तुम्हाला असंच येईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button