वृश्चिक राशीच्या लोकांनी एकदा नक्की वाचा…

नमस्कार मंडळी, आज आपण राशिचक्रातल्या आठव्या राशीबद्दल म्हणजे वृश्चिक राशीबद्दल बोलणार आहोत वृश्चिक राशीची लोक हि दिसायला आकर्षक असतात ह्यांचा बांधा हा समतोल असतो म्हणजे हे लोक ना जास्त जाड असतात ना जास्त बारीक त्यामुळे दिसायला आकर्षक आणि डॅशिंग असतात वृश्चिक राशी हि स्थिर स्वभावी राशी आहे त्यामुळे ह्या लोकांचा स्वभाव काहीसा हट्टी किंवा जिद्दी असतो .
आपला हट्ट हे लोक सहसा सोडत नाहीत मोडेल पण वाकणार नाही अशी काहीशी वृत्ती ह्या लोकांची असते हि लोक आपल्या मतांवर ठाम असतात म्हणजे समोरची व्यक्ती कधीही आपले मत ह्यांच्यावर लादू शकत नाही . वृश्चिक राशीची लोक हि सुंदर प्रकारे संवाद करून समोरच्याला आपली मते कशी बरोबर आहेत हे पटवून देतात आणि आपली मते ना बदलता त्यावर ठाम असतात वृश्चिक राशी हि तमो गुणी राशी आहे तमो गुणी असल्यामुळे ह्या व्यक्तींचा स्वभाव हा रागीट किंवा क्रूर दिसतो.
ह्या व्यक्ती पटकन क्रूर पणे समोरच्याला उत्तर देतात त्यामुळे समोरच्याला राग येऊ शकतो अजून एक गोष्ट म्हणजे हि लोक समोरच्या व्यक्तीला पटकन माफ करत नाहीत समजा एखादी व्यक्ती एकदा का ह्यांच्या नजरेतून उतरली कि हे परत त्या व्यक्तीला सहसा आपल्या जीवनात परत स्थान देत नाहीत . हि लोक समोरासमोर जरी सडेतोड बोलत असली तरी मागून कोणाला काही वाईट बोलत नाहीत मागून टीका करणे हे ह्यांना जमत नाही जे आहे ते तोंडावर सडेतोड पणे बोलतात भले त्याने समोरचा व्यक्ती दुखावला गेला तरी चालेल .
हि राशी जल तत्वाची राशी आहे त्यामळे सडेतोड पण जरी असले तरी हि रास भावनिक रास आहे पटकन राग येतो तसा तो लगेच वीरूनही जातो भावनिक असल्यामुळे हि लोक आपल्या कुटुंबाचे पालनपोषण खूप प्रेमाने आणि भावनिक होऊन करतात वृश्चिकेची आई हि कठोर वाटली तरी आतून ती आपल्या कुटुंब साठी खूप भावनिक असते खूप छान पद्धतीने जबाबदारीने ती आपल्या परिवाराची काळजी घेते . वृश्चिक राशीची लोक प्रेम करतात ते प्रेम अगदी मनापासून करतात आपल्या प्रेमासाठी हि लोक आपला सर्वस्व अर्पण करू शकतात.
इतकी भावनिक हि लोक असतात आणि वृश्चिक राशीची लोक गुरु असतील तर ते ज्ञान पण अगदी निस्वार्थ भावनेने देऊन ठाकतात पण हि अपेक्षा करू नका कि वृश्चिक राशीची लोक तुम्हाला प्रेमाने शिकवतील ते शिकवताना ते अगदी कडक पणे शिकवतील पण अगदी छान पणे शिकवतील मुक्त हस्ताने शिकवतील त्यामळे ज्ञान घ्यायचे असेल तर ते वृश्चिकेच्या गुरु कडून मिळावं
अशी जर तुमची इच्छा असेल तर त्यांचा कडक पणा तुम्हाला सहन करता आला पाहिजे . हि रास भावनिक आहे त्यांना आपल्या भावनांचं प्रदर्शन करायला सहसा आवडत नाही .कितीही दुःख असला तरी ते मनात ठेवतात आणि कोणाला बोलून दाखवत नाहीत किंवा आपल्या चेहऱ्यावर दाखवत नाहीत तर अशी हि जीवन जगण्याची अप्रतिम कला ह्यांच्याकडे आहे . भावनिक असून सुद्धा जो कडकपणा किंवा जी धडाडी ह्यांच्या मध्ये आहे
त्यामुळे हे लोक आपल्या भावनांचा कडेलोट होऊ देत नाहीत स्वतःची दुःख समाजपुढे आणत नाहीत आत कितीही दुःख असला तरी चेहरावर दाखवत नाहीत. वृश्चिकेची लोक हे करू शकतात कारण हि मंगळाची राशी आहे ह्या राशीचा स्वामी हा मंगळ आहे मंगळ हा एक रजोगुणी ग्रह आहे त्यामुळे ह्यांच्यामध्ये खूप आत्मविश्वास असतो.
वृश्चिक राशीचा माणूस जर एखादा काम करतो तर त्या कामाचा स्पीड हा खूप असतो काम उगाच रेंगाळत ठेवायला ह्यांना आवडत नाही .ह्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची वृत्ती असते म्हणजे कोणाच्या हाताखाली काम करायला सहसा आवडत नाही ह्यांच्या आयुष्यात कोणी ढवळाढवळ केलेली ह्यांना आवडत नाहीत कारण हे कोणाच्या आयुष्यात सहसा नाक खुपसत नाहीत.
मंगळाची रास असल्यामुळे धडाडी किंवा नेतृत्वगुण हा जन्मजात असतो त्यामुळे हे लोक सैन्यामध्ये किंवा पोलीस खात्यात उत्तम कामगिरी बजावू शकतात. ह्या राशीच चिन्ह हे विंचू आहे म्हणजे स्वतःहून डंक मारणार नाहीत.
पण जर कोणी डिवचलं तर त्याला डंक मारल्याशिवाय राहणार नाहीत. वृश्चिकेचा अंमल हा गुप्तांगाच्या आतल्या बाजूवर असल्यामुळे थोडे वासना प्रिय हि लोक असतात तसेच गुप्तांगांचे आजार हे ह्यांना सहज होऊ शकतात म्हणून ह्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. ह्य राशीच्या लोकांचा स्वभाव जितका तिखट किंवा तीक्ष्ण असतो तितकीच तीक्ष्ण ह्यांची बुद्धीसुद्धा असते ह्यांचा बोलणं मुद्देसूद असता विनाकारण फापटपसारा करून बोलायला ह्यांना आवडत नाही .
हि लोक सहसा कोणावर लवकर विश्वास ठेवत नाहीत त्यामुळे ह्यांना सांगितलेले गुपित हे गुपितच राहते ते गावभर करत नाहीत .ह्या राशीच्या लोकांना गूढशास्त्रात विशेष रुची असते त्यामुळे वृश्चिकेचा व्यक्ती हा चांगला जोतिषी होऊ शकतो ह्यांना ज्ञानाची भूक असते त्यामुळे हे लोक नेहमी शिकत राहतात त्यामुळे कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान हे लोक मिळवतात .
हि वर्तमानात जगणारी रास आहे भूतकाळात अडकून पडत नाहीत कि भविष्याची चिंता करत बसत नाहीत जे आहे ते आज आता आहे उद्या कोणी पाहिलंय अशी काहीशी वृत्ती असते.ह्या राशीच्या लोकांना मस्करी सहन होत नाही काही कोणी सहज मस्करी म्हणून बोलला तरी हे लोक ती गोष्ट सिरिअसली घेतात त्यांना त्या गोष्टीचा पटकन राग पण येतो. हि लोक जरी बाहेरून काटेरी असली तरी फणसासारखे आतून गोड मधुर असतात
अनुशासन रागीटपणा सडेतोड उत्तर देणे हे जरी असला तरी अशी लोक खूप धडाडीने काम करणारी ज्ञानाचा भांडार असलेले असतात. तुमच्या आयुष्यात जर तुमचा जोडीदार वृश्चिकेचा असेल तर त्यांच्या काट्या सारख्या स्वभावाकडे ना बघता त्याचं वात्सल्य प्रेम कुटुंबाची काळजी जबदारीची जाणीव असणं ह्या सद्गुणाकडे बघा त्यांना थोडा समजून घेतला तर वृश्चिकेसारखी दुसरी रास नाही.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद