राशिभविष्य

वृषभ रास.. समाजात मान सन्मानात होणार वाढ.. चारही बाजूंनी पैसाच पैसा येणार..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे..

मेष रास – आजच्या दिवशी चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभ भावात असेल. आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या सहलीचे यशस्वी नियोजन करू शकाल. दुपार नंतर मात्र मानसिक एकाग्रता होणार नाही. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. स्वकीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल.

वृषभ रास – चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल. दांपत्य जीवनात आनंद दरवळेल. नवीन कार्याच्या आयोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ संभवतात. एखाद्या रमणीय स्थळी सहलीचे आयोजन करू शकाल.

मिथुन रास – चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्य भावात असेल. आज प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले असेल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक दृष्टया अनुकूलता जाणवेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. धनप्राप्ती संभवते. कुटुंबात सुख शांती नांदेल.

कर्क रास – चंद्र आज आपल्या राशी पासून अष्टम भावात असेल. आज अवैध व निषेधार्ह विचारां पासून दूर राहणे हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. संतती विषयक चिंता निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठांशी झालेल्या वादामुळे आपल्या मनाला दुःख होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणे हितावह राहील.

सिंह रास – चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातव्या भावात असेल. आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र व संबंधितांसह हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा करू शकाल. सामाजिक सन्मान होतील. भागीदारांसह सकारात्मक चर्चा होईल. दुपार नंतर मानसिक नैराश्य जाणवेल. संतापाची भावना वाढेल. कुटुंबात वादविवाद होऊ नयेत ह्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

कन्या रास – चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहाव्या भावात असेल. आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश व कीर्ती वाढेल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्नता जाणवेल. घरात सुखशांती नांदेल. प्रत्येक कामातून दृढ मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. एखादा प्रवास संभवतो.

तूळ रास – चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचव्या भावात असेल. आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असाल. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. आज शक्यतो प्रवास टाळावा. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता आहे. दुपार नंतर कामे यशस्वी झाल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आज यश व कीर्ती प्राप्त होईल. व्यवसायात चांगले सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

वृश्चिक रास – चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथ्या भावात असेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्वभावातील हट्टीपणा सोडल्यास अनेक समस्या सुटतील. आज नवीन वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने ह्यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक योजना सहजपणे राबवू शकाल. दुपार नंतर वैचारिक स्थैर्य राहणार नाही. आज नवीन कार्य हाती घेणे हितावह राहणार नाही.

धनु रास – चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसऱ्या भावात असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. मित्र व स्वकीयांसह वेळेचा सदुपयोग आनंददायी वातावरणात करू शकाल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक दृष्टया आपण बेचैन राहाल. सौंदर्य प्रासधने, गृहसजावट व मनोरंजनाची साधने खरेदी करू शकाल. स्थावर मालमत्ते विषयक कागद पत्रांवर सही करताना काळजी घ्यावी लागेल.

मकर रास – चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसऱ्या भावात असेल. आज वाद होण्याची शक्यता आहे. आज एखाद्या धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपार नंतर मन प्रफुल्लित राहील. शारीरिक स्वास्थ्य मिळेल. नशिबाची साथ मिळेल. एखादा प्रवास संभवतो. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मनाला आनंद वाटेल.

कुंभ रास – आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज आपले मन आनंदी राहील. मनात नकारात्मक विचार येतील. आपल्या कृती संयमित ठेवाव्या लागतील. अचानकपणे खर्च उदभवतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. आपण केलेल्या कामाकडे कोणी लक्ष न दिल्याने आपणास नैराश्य येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील.

मीन रास – चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बाराव्या भावात असेल. आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नाही. आज वाद संभवतात. मन एकाग्र होण्यात अडचणी येतील. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुता निर्माण होईल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मनःस्वास्थ्यही मिळेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. कुटुंबीयांकडून सुख मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button