या राशीच्या लोकांवर हनुमानजी येऊ देत नाहीत कुठलंही संकट; नेहमीच असतात पाठीशी…

ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आहेत. यांपैकी काही राशी अशाही आहेत, ज्या राशींवर प्रभू हनुमान यांची विशेष कृपादृष्टी असते. मंगळवार हा हनुमानजींना समर्पित असलेला वार आहे. या दिवशी विधिवत पूजा केल्यास त्याचा विशेष आशीर्वाद मिळतो.
असे म्हटले जाते, की बजरंगबली आपल्या भक्तांवर कधीच कोणतेही संकट येऊ देत नाहीत. त्याची पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. ज्योतिष शास्त्रात अशा चार राशी आहेत, ज्यांवर हनुमानजींची विशेष कृपादृष्टी असते.
मेष – ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीचा हनुमानजींच्या आवडत्या राशींमध्ये समावेश होतो. या राशीच्या लोकांवर बजरंगबलीची विशेष कृपादृष्टी असते, असे मानले जाते. मेष राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमानजींची पूजा करावी, असे सांगितले जाते. असे केल्यास या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील संकटे दूर होतात. या राशीच्या लोकांना कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही.
वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा असते, असे मानले जाते. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने संबंधित व्यक्तीला सर्व कामांत यश मिळते. एवढेच नाही, तर त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नाही.
सिंह – ज्योतिष शास्त्रानुसार, सिंह रास देखील हनुमानजींची आवडती रास आहे. या राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा राहते. या लोकांवर त्यांची नेहमीच कृपादृष्टी असते. सिंह राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्यास, त्यांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. हनुमानजी त्यांच्या सर्व समस्या दूर करतात, असे मानले जाते.
कुंभ – असे मानले जाते, की कुंभ राशीच्या लोकांवरही हनुमानजींची विशेष कृपादृष्टी असते. हनुमानजींच्या कृपेमुळे कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळते. तसेच त्यांची आर्थिक टंचाईतूनही सुटका होते. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने कोणत्याही कामात अडचण येत नाही. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते आणि त्यांची आर्थिक स्थितीही चांगली असते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद