६७ दिवस महालक्ष्मी योग: ५ राशींना राजयोग वरदान, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; लक्ष्मीकृपा शुभ करेल!
अधिक मास सुरू असून, या कालावधीत अनेकविध प्रकारचे शुभ योग जुळून येत आहेत. यंदाचा अधिक मास श्रावण महिना असून, अधिक मासाचे स्वामित्व श्रीविष्णू यांच्याकडे असल्याने याला पुरुषोत्तम मास म्हटले गेले आहे. या काळात श्रीविष्णूंचे नामस्मरण, पूजन, जपजाप, आराधना, उपासना यथाशक्ती करावी. याचे दसपट पुण्य मिळते, अशी मान्यता आहे.
नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करत आहे. बुधाला व्यापार, बुद्धी आणि शिक्षणाचा कारक मानले गेले आहे. या राशीत शुक्र ग्रह विराजमान आहे. बुध आणि शुक्राच्या युतीने लक्ष्मी-नारायण योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय महालक्ष्मी नामक शुभ योग जुळून येत आहे. बुध सुमारे ६७ या राशीत विराजमान असेल.
सिंह राशीत त्रिग्रही योगही जुळून आला आहे. या राशीत मंगळ, शुक्र आणि बुध विराजमान आहेत. याशिवाय हे तीनही ग्रह कुंभ राशीत असलेल्या शनीपासून सातव्या स्थानी असल्याने शनी आणि मंगळ- बुध-शुक्राचा चतुर्ग्रही समसप्तक योग जुळून आला आहे. बुधच्या सिंह राशीतील गोचराचा नेमक्या कोणत्या राशींना उत्तम लाभ, सर्वोत्तम संधी आणि यश-प्रगतीकारक काळ ठरू शकेल? जाणून घेऊया…
मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. प्रयत्न वाढवायला हवेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील. विचारशक्ती आणि आकलन शक्ती वाढेल. नोकरदारांना अनेक चांगल्या संधी मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुकही होणार आहे. व्यवसाय विस्तारण्यासाठी चांगली वेळ ठरू शकेल. वादाला सामोरे जावे लागू शकते.
वृषभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळात संभाषणात अधिक सुस्पष्टता राहील. बोलण्यात सकारात्मकता दिसून येईल. इतरांना आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बौद्धिक स्तरावर विकास होईल. कौटुंबिक वातावरणाच्या दृष्टीने हा काळ चांगला जाणार आहे. प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी काळ चांगला ठरू शकेल. शिक्षण, उद्योग, विक्री आणि विपणनाशी संबंधित आहेत किंवा सल्लागार आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभ राहू शकेल.
मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी काळात बुधाचा अधिक प्रभाव दिसून येऊ शकेल. आरोग्य चांगले राहू शकेल. व्यायाम, ध्यान- धारणा करणे उपयुक्त ठरू शकेल. फिरायला जाण्याचा प्लान करू शकाल. कामे पूर्ण करण्यासाठी भावंडांचे सहकार्य मिळेल. लेखक, साहित्यिक आणि संपादक यांना हा काळ भाग्याचा ठरू शकेल. क्रीडा जगताशी संबंधित लोकांसाठी काळ विशेष अनुकूल राहील.
कर्क राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सतर्क राहण्याचा ठरू शकेल. खर्चात अचानक वाढ होईल. आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील. कौटुंबिक व्यवसायात गुंतलेल्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील. व्यवसायाशी संबंधित काही निर्णयांमुळे फायदा होऊ शकतो. या काळात गुंतवणूक टाळा. अन्यथा नुकसान होऊ शकते. आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे.
सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी काळ धनलाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे लाभ मिळण्याची शक्यता आहे. हिम्मत वाढेल. मोठी जोखीम पत्करण्याची आणि आयुष्यातील संधींचे यशात रूपांतर करण्याची संधी सोडू नये. आरोग्याबाबत गाफील राहू नका.
कन्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ शुभ परिणामकारक ठरू शकेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी चांगली वेळ आहे. अनावश्यक गोष्टींवर आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ शकतील. उत्पन्न आणि खर्चात संतुलन न राहिल्याने बजेट बिघडू शकेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ अनेक शुभ संधी घेऊन येईल. परदेश प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही मौसमी आजारांचा त्रास होऊ शकतो.
तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ विशेष लाभदायक ठरू शकेल. नोकरदारांना हा काळ भाग्यवान ठरू शकेल. कमी कष्ट करून उत्पन्न वाढवू शकाल. कला आणि सांस्कृतिक गोष्टींशी निगडित लोकांसाठी वेळ शुभ राहणार आहे. सर्जनशील कल्पनांमध्ये वाढ होईल. झटपट पैसे कमवण्यासाठी बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल राहू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रभाव पडेल. प्रगतीचा वेग थोडा कमी होऊ शकतो. आकस्मिक परिस्थितीमुळे जॉब प्रोफाईलमध्ये काही बदल संभवतात. मित्रांच्या मदतीने तुम्हाला चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. नियोजनानुसार काम करून व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे.
धनु राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला जाऊ शकाल. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग जुळून येऊ शकेल. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे. वरिष्ठ आणि बॉस यांचे चांगले सहकार्य मिळेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेळ विशेष राहील. एखाद्या मालमत्तेत किंवा जमिनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता.
मकर राशीच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्यावर परिणाम होऊ शकेल. आरोग्याकडे खूप लक्ष देणे आवश्यक आहे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. या काळात व्यावसायिकांना चांगल्या संधी मिळण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
मीन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. जोडीदारासोबत मतभेद, वाद होण्याची शक्यता आहे. शांत राहावे. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय, अधिक शक्तिशाली राहतील. सावध राहावे. राजकारणापासून दूर रहावे. आर्थिक नुकसान होऊ शकते. मालमत्ता किंवा जमिनीत गुंतवणूक करणे सध्या टाळा. कर्ज घेण्यासाठी हा काळ अनुकूल नाही. मानसिक तणाव राहू शकेल. योग आणि ध्यान नियमित करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद