महादेवाच्या कृपेने श्रावणात ‘या’ राशी होतील धनवान? ‘शुभ योग’ जुळून आल्याने मिळू शकतो. व्यवसाय करिअरमध्ये नफा…
हिंदू धर्मांत अधिक मासाला मोठे महत्त्व आहे. यालाच मलमास, पुरूषोत्तम मास किंवा ग्रामीण भागात धोंड्याचा महिनाही म्हटले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा तब्बल १९ वर्षांनंतर श्रावण महिन्यात अधिक मासाचा दुर्मिळ योग आलेला आहे.
श्रावण महिना हा शिवशंकराच्या भक्तांसाठी खास मानला जात असून यंदा श्रावण मास हा ५९ दिवसांचा असून यादरम्यान ८ श्रावणी सोमवार येतील.
श्रावण वृषभ राशीतील मंडळीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कार्यक्षेत्रात मोठं यश प्राप्त होण्याची शक्यता असून वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन राशीला यंदा शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळाली असल्याने श्रावणात त्यांना शंकराची कृपा दुप्पटीने लाभू शकते. रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. तसेच नोकरीच्या नव्या संधीही याकाळात उपलब्ध होऊ शकतात.
सिंह राशीसाठी श्रावण महिना चांगला ठरू शकतो. कार्यक्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
या राशींच्या लोकांवर भोलेनाथाची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे.
मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्ही कोणतेही पद देखील मिळवू शकता.
श्रावण महिना धनु राशीतील मंडळीसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरु शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.
नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणेही फायदेशीर ठरू शकते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद