अध्यात्मिक

बघा अहंकारामुळे कामे कसे बिघडतात, स्वामींची भक्ती करून यशाचे शिखर कसे मिळते.

अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माणूस मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर यश मिळवत असतो मात्र त्याचा अहंकार आला की त्याची अधोगतीकडे वाटचाल सुरू होते आपल्या आराध्याची निस्सीम निरपेक्ष भक्ती सेवा केल्यास गुरूचा आशीर्वाद लाभदायक ठरवून पुन्हा एकदा प्रगतीकडे वाटचाल करता येऊ शकते अशी शिकवण आपले महाराज देत असतात.

ब्रम्हांडनायक अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना कोट्यवधी भक्त दररोज भजन-पूजन असतात काही जणांच्या मुखी सदैव आपल्या स्वामींचे नाव असते भक्ति निरपेक्ष असावी गुरूचा आशीर्वाद पाठीशी असणाऱ्यांना मग कशाचेही भय राहात नाही सत्कर्म सातत्य जिद्द परिश्रम यांच्या जोरावर तो यश आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतोमात्र यश आणि प्रगतीचे वारे अंगात भिनवून डोक्यापर्यंत पोहोचले की त्याला गर्व होतो आणि

मग याचा पुढचा टप्पा म्हणजे अहंकार माणूस एकदा अहंकारी झाला की त्याला दुसरे चांगले काही दिसत नाही कितीही ज्ञान पदरात पडले तरी अहंकारी माणूस अधोग तीच्या मार्गाला लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रावण अहंकार प्रगतीला मारक ठरतो असे आपण अनेकदा ऐकतो स्वामी समर्थ महाराजांनी एका घटनेतून ते समाजा ला पुन्हा प्रत्ययाला आणून दीले नेमके काय घडले बरे हे आपण जाणून घेणार.

स्वामी समर्थ महाराज मूर्ती सरस्वतीं चे अवतार आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण हे रामदासी बुवाना फारसे पटत नव्हते रामदासी बुवा एक मठाचे महंत होते ते प्रचंड ज्ञानी विज्ञानी होतेपरंतु अहंकारी आणि फार गर्विष्ठ होते वेद शास्त्रामध्ये भल्या भल्या विद्वानांना ते चितपट करत असे एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला की त्याला दंड किंवा शिक्षा करायचे आणि शिक्षा म्हणून आपले पायतान डोक्यावर घेऊन उभे

ठेवायचे एक दिवस स्वामींनी तिथे येऊन मुक्कामाची परवानगी मागितली महंताच्या मठामध्ये जागा म्हणून ध्यान कक्षात केवळ एका तासासाठी मुक्काम करण्यासाठी त्यांनी स्वामींना सांगितले त्या ध्यान कक्षांमध्ये स्वामी अतिशय गाढ झोपी गेली एका तासाने महंत तिथे आले आणि त्यांनी स्वामींना उठवलेमात्र स्वामी उठतच नव्हते अनेकदा आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही स्वामी जागे होत नाही हे पाहिल्यावर स्वामींना धडा शिकवावा असे महंताच्या मनात आले महंत बुवांनी काय केले खोलीला बाहेरून कुलूप लावून तिथून निघून गेले स्वामी महंतांच्या मठामध्ये आले आहे हे म्हटल्यावर

स्वामीभक्त असणारे गोरे शास्त्री स्वामींचे दर्शन घेण्यासा ठी तेथे आले महंतांनी त्यांना सांगितले की त्यांनी स्वामींना खोलीमध्ये डांबून ठेवले आहे गोरे शास्त्री चपापले आणि महंतांना त्यांनी सांगितले स्वामी चैतन्यस्व रूप आहे त्यांना कोणीही डांबून ठेवू शकत नाही शास्त्री बुवांचा मताला महंतांनी फारशी किंमत दिली नाही गोरे शास्त्री स्वामींच्या खोलीच्या बाहेर येऊन चिंतामण घेऊन बसले होते थोड्यावेळाने ते तेथून बाहेर पडले फिरता फिरता ते एका सरोवरापाशी आले आणि पाहतात ते काय स्वामी सूर्याला अर्घ्य देत होते तेवढ्यात महंत रामदासी बुवा हे तेथे पोहोचले स्वामींना पाहून महंता थबकले स्वामी बाहेर आले महंतांनी शास्त्रीबुवांसोबत पुन्हा मठात गेले महंतांनी खोलीचे दार उघडले तर तिथे स्वामी गाढ झोपलेले होते दुसरीकडे स्वामी त्यांच्यासोबत उभी असल्याचे ते पाहत होते एकाच ठिकाणी स्वामींचे दोन

रूपे पाहून ते आश्चर्यचकित झाले काही काळ नेमके काय करावे आणि काय बोलावे हे त्यांना कळतच नव्हतेशेवटी त्यांनी स्वामींचे पाय धरले आणि त्यांना शरण गेले बुवा तुम्ही ज्ञानी आहात विद्वान आहात मात्र अहंकार तुमच्या प्रगतीसाठी बादक ठरला आहे अहंकाराने राग येतो आणि राग माणसाला राखेत मिळवतो प्रचंड माहिती असूनही अहंकारामुळे प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही ही साधी बाब आपल्या लक्षात आली नाही ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते कारण ज्ञानामध्ये अपेक्षा असते मात्र भक्ती ही निरपेक्ष असते अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीच या मार्गावर पुढे गेलात तर यशोशिखरावर नक्कीच होईल अशी शिकवण आपले स्वामी देतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button