राशिभविष्य

अधिक मास या 8 राशींसाठी सुवर्ण काळाची सुरुवात.. धनलाभ अमाप यश आणि प्रगतीचा काळ..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… नवग्रहांचा राजा मानला गेलेला रवी कर्क राशीत विराजमान झाला आहे. (Adhikmaas Rashi Parivartan) अन्य कोणतेही ग्रहपालट नाहीत. गुरु, राहू आणि हर्षल मेष राशित रवी मिथुन राशित आहे. कर्क राशीत विराजमान झाल्यानंतर रवीची बुधाशी युती होईल. यामुळे बुधादित्य नामक अत्यंत शुभ मानला गेलेला राजयोग जुळून येऊ शकेल. मात्र, हा राजयोग काही कालावधीसाठी जुळून येईल. बुधाच्या राशीपरिवर्तनानंतर या शुभ योगाची सांगता होईल.

मंगळ आणि शुक्र सिंह राशीत, केतू तुळ राशित, प्लूटो मकर राशित, शनी कुंभ राशित, तर नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीतून राहील. दर्श अमावास्या, दीपपूजन साजरे केले जात आहे. मंगळवारी कर आहे. शुक्रवारी विनायक चतुर्थी आहे. याशिवाय अधिक महिना सुरु होत आहे. याला पुरुषोत्तम मासही म्हटले जाते.

एकूण ग्रहमान पाहता आगामी काळ आपल्यासाठी कसा असेल? करिअर, नोकरी, शिक्षण, व्यवसाय, कुटुंब याबाबत कोणत्या राशींना लाभ मिळू शकतील? कोणत्या राशींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल? जाणून घेऊयात…

मेष रास – मित्रांसह मौज मजा करण्याची संधी मिळेल. त्यांच्यासह बाहेर फिरावयास जाल. जुन्या आठवणी ताज्या झाल्याने मन प्रसन्न होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असली तरी कोणाशी वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. व्यापारात उत्तम यश प्राप्ती होईल. आपले प्रयत्न यशस्वी होऊन काही अनपेक्षित फायदा सुद्धा होईल. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. प्रकृतीत सुधारणा होईल. जुन्या विकारातून बहुतांशी मुक्ती मिळेल.

वृषभ रास – आगामी काळ अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश व रोमँटिक असलेले दिसतील. एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्री मोठे यश प्राप्त होईल. ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना जास्त फायदा होईल. व्यापारी व्यापार वृद्धीसाठी काही नवीन प्रयोग करतील व त्यामुळे त्यांना चांगला लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी खूपच छान काळ आहे. त्यांची मेहनत यशस्वी होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवावे.

मिथुन रास – मध्यम फलदायी काळ आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात माधुर्य निर्माण होईल. एकमेकांत उत्तम समन्वय साधला गेल्याने आपण आपले वैवाहिक जीवन अधिक सुखद करू शकाल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली कामे बिघडू नयेत म्हणून मानसिक तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा. नशीब प्रबळ असल्याने आपणास कमी श्रमात जास्त यश मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी अनुकूल काळ आहे. अनुभवाच्या व कौशल्याच्या जोरावर नोकरीत फायदा मिळवू शकाल. व्यापाऱ्यांना बाजारातून चांगला परतावा मिळेल. तज्ज्ञ व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी मिळेल. सल्ला उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करावा लागेल. आत्मविश्वास उत्तम असल्याचा त्यांना फायदा होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कर्क रास – चांगला काळ आहे. वैवाहिक जीवनात शांतता नांदेल. योजना एखाद्याला सांगितल्यास ती व्यक्ती त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास संभवतो. खर्च बरेच होतील, मात्र हे खर्च योग्य कारणांसाठीच झाल्यामुळे समाधान होईल. मन व बुद्धी जलद गतीने काम करेल. जे काम इतरांना अवघड वाटेल ते आपण सहजपणे करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी व व्यापारात कामगिरी उंचावण्यात यशस्वी व्हाल. सर्व कामे चांगली झाल्याने आपल्या मनाचे समाधान होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासासह इतर प्रवृत्तींकडे लक्ष द्यावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे. तेलकट व मसालेदार पदार्थ आहारात घेणे टाळावे.

सिंह रास – आनंदात नावीन्य घेऊन येणारा काळ आहे. दांपत्य जीवनातील समस्या दूर होतील. प्राप्तीत मोठी वाढ होत असल्याचे दिसून आल्याने मन खुश होईल. खर्चात कपात होईल. मोठी चिंता दूर होईल. ईश्वर कृपेने कामे होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची स्थिती मजबूत होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यापारासाठी अनुकूल काळ आहे. काही नवीन लोकांना भेटून काम केल्यास लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. उच्च शिक्षणात मोठे यश मिळू शकते.

कन्या रास – थोडा आव्हानात्मक काळ आहे. बरीचशी कामे वेळेवर करणे चिंतेचा विषय होऊ शकतो. काहीसे भांबावलेले दिसू शकता. तसेच एकाच वेळी अनेक कामे उरकल्यामुळे बरीचशी ऊर्जा खर्च होईल. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती खूप मेहनत करतील, परंतु काही ना काही कारणाने कामात चुका होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतिक्षीत असलेल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा पाठिंबा मिळू शकतो. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. एखादे चांगले यश प्राप्त होऊ शकते. मिळालेल्या संधीचा सदुपयोग करावा. स्पर्धेत सुद्धा चांगले यश मिळू शकते.

तूळ रास – अत्यंत व्यस्त राहाल. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण एकमेकांना उत्तम सहकार्य कराल. कामात खूप मेहनत कराल. नोकरीच्या ठिकाणी खूप कार्यरत असल्याचे दिसून येईल. सर्व कामे आपण वेळेवर पूर्ण करू शकाल. प्रतिमा उंचावेल. व्यापाऱ्यांना एखादी मोठी संधी मिळू शकते. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी आपली ओळख होईल. आर्थिक लाभ होतील. आनंद व लाभ अशा दोघांची प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांसाठी चढ-उतारांचा काळ आहे. असे असले तरी वेळ काढून आपला अभ्यास करू शकाल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

वृश्चिक रास – सासुरवाडीकडील व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना आपल्या योजनांचा पुनर्विचार करावा लागेल, अन्यथा त्यांच्या योजना स्थगित होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला काळ आहे. ते मन लावून कामे वेळेवर पूर्ण करतील. त्यांचे वरिष्ठ त्यांच्या कामगिरीने प्रभावित होतील. हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. स्पर्धेत यश मिळू शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

धनु रास – संतती कडून सुख मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणालाही अपशब्द बोलू नका. व्यापारात मित्रांचे सहकार्य मिळू शकते. व्यवसाय उत्तम चालेल. हा कालावधी प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल आहे. एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. अचानकपणे लाभ झाल्याने आनंद गगनात मावणार नाही. नोकरीच्या ठिकाणी परिस्थितीत चढ – उतार येतील, तेव्हा लक्ष पूर्वक कामे करावीत. विद्यार्थ्यांना प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल. अभ्यासात कामगिरी चांगली होईल. योगासन व व्यायामासाठी वेळ काढावा.

मकर रास – कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरण्याची संभावना आहे. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. वैवाहिक जीवनासाठी अनुकूल आहे. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. आर्थिक दृष्ट्या मिश्र फलदायी काळ आहे. एकीकडे आर्थिक चिंता सतावतील तर दुसरीकडे प्राप्तीत वाढ झाल्याने आनंद होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाचा आनंद उपभोगता येईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती उंचावल्याने कामगिरी चांगली होईल. व्यापाऱ्यांसाठी कालावधी अनुकूल असल्याने फायदा उचलावा. एखादा नवीन व्यापारी सौदा करू शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

कुंभ रास – विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडू शकाल. संतती संबंधी काळजी दूर होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ चढ-उताराने भरलेला आहे. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यापारात यशस्वी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम व यश प्राप्त होईल.

मीन रास – विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण कराल. मन प्रसन्न राहील. सर्वांशी मिळून मिसळून संवाद साधाल. मित्रांशी गप्पा गोष्टी करण्याची संधी मिळेल. लक्ष आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यावर राहील. पैसा कमावण्यावर लक्ष केंद्रित होईल. बँकेतील गंगाजळी वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात यश प्राप्त होईल. विरोधकांपासून थोडे सावध राहावे. व्यापाऱ्यांना निव्वळ कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. करचोरी टाळावी. त्याने फायदा होईल. अडचणीत येऊ शकणार नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button