राशिभविष्य

अधिक पौर्णिमेला २ मातींच्या दिव्यांचा हा उपाय आवर्जून करा, आयुष्याचे कल्याण होणारच…

यंदा अधिक मासामुळे श्रावण महिन्यात आलेली ही पौर्णिमा अत्यंत खास आणि फलदायी असल्याचे सांगितले जाते. म्हणूनच यंदाच्या अधिक मासातील पौर्णिमेला केलेला हा दोन दिवसांचा अद्वत उपाय तुमच्यासाठी दुर्भाग्य दूर करणारे ठरू शकतो आणि या उपायाने धनलाभाचे ही संकेत जुळून येतात सांगण्यात येत. चला तर मग कोणता उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जाणून घेऊयात.

पोर्णिमा तिथे प्रत्येक महिन्यात येते परंतु यावेळी पौर्णिमेची तिथी अत्यंत खास मानली गेली. कारण अधिकमास सुरू झालाय आणि अधिक मास तीन वर्षातून एकदाच येतो.मात्र हा अधिक मास श्रावण महिना आल्यामुळे या महिन्यात येणारी पौर्णिमा तिथी अत्यंत खास मानली जाते. कारण भगवान श्रीहरी विष्णूंना अधिकमास समर्पित आहे आणि श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे.

मात्र ही पौर्णिमा मंगळवारी आल्याने श्री हनुमानाच्या आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होणार असल्याचे सांगितले जाते एकंदरीत सर्वच देवांचे आशीर्वाद आपण या दिवशी प्राप्त करून घेऊ शकतो. मात्र ही संधी आपल्याला कधी मिळेल हे सांगता येणार नाही. अधिक महिन्यात आलेल्या या पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते अस सुद्धा सांगण्यात येते.

या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होत आणि पापंपासून मुक्ती मिळते असेही म्हणतात. घरात सुख शांती आनंद मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून पहा आणि आम्हालाही अनुभव सांगा काय करायच आहे. तर यासाठी दोन मातीच्या पणत्या किंवा मातीचे दोन दिवे घ्यायचे आहेत. मात्र हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठूनच करायचा आहे.

तरच त्याच्या लाभ तुम्हाला मिळू शकतात. तर तुम्हाला काय करायच आहे या दोन्ही मातीच्या पणत्या देवपूजेच्या वेळी घ्यायचे आहेत. त्या दोन्ही दिव्यांमध्ये वाद ठेवायचे आहे. मात्र ही वात खोबऱ्याच्या तेलाने भिजलेली असावी आणि दिवा लावताना मात्र त्याच तिळाचे तेल ओताव त्यानंतर या दिव्यामध्ये ११ अक्षता अर्पण कराव्यात त्यानंतर दोन लवंगा सुद्धा या दिव्यामध्ये टाकाव्यात आणि भीमसेनी कापूस सुद्धा या दिव्यामध्ये टाकावा.

हे दोन्ही दिवे एक एक करून तयार करून घ्यावे. त्यानंतर दिव्याची पूजा करावी. देवपूजा सुद्धा सोबतच करावी. किंवा देवपूजा करताना सुद्धा हा उपाय केला जाऊ शकतो. मात्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करावा. यातला एक दिवा दिवा जवळ ठेवावा आणि दुसरा दिवा लावून तो मुख्य दरवाज्याजवळ ठेवावा.

मात्र हा दिवा दारात ठेवताना दाराची सुद्धा साफसफाई झालेली असावी. दारात चपला जोडी नसावे आणि घाण साचलेली सुद्धा नसावी. अगदी पूजा करायला बसण्याआधी सर्व घर स्वच्छ करून घ्याव. दार सुद्धा स्वच्छ करून घ्याव आणि हा दिवा मुख्य दरवाजात ठेवावा. घराचे मुख्य दरवाजा कोणत्याही दिशेला असेल तरी दिव्याच तोंड उत्तरेलाच करून ठेवाव आणि त्या दाराबाहेरून घराच्या आत बघून सर्व देवांना प्रार्थना करावी.

आणि सकारात्मक रित्या बोलून देवांचा आशीर्वाद घ्यावा. यावेळी तुम्हाला तुमच्या समस्या सांगायच्या नाही आहे तर सकारात्मकतेने बोलायच आहे. म्हणजे काय म्हणाल तर माझ्या सर्व समस्या संपलेल्या आहेत आणि देव नेहमी माझ्या पाठीशी उभ्या आहे. माझ्या घराची भरभराट होते. अशा प्रकारे आपले शब्द बोलून देवाला नमस्कार करून पूजा संपन्न करावी.

हा उपाय तुम्ही पौर्णिमेला करू शकता.मात्र आधी सांगितल्याप्रमाणे ही संधी तुम्हाला नंतर कधीही मिळणार नाही. तर तुम्ही या अधिक श्रावण पौर्णिमेलाच हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या सर्व समस्या दूर होतील. घराची आर्थिक भरभराट होईल. मात्र हा दिवावीजला तर पुन्हा लावू नका. तो तसाच विसर्जित करून घ्या. अगदी सायंकाळी हा दिवा विसर्जित केला तरी चालतो. तुम्हाला या उपायाने तुम्हाला नक्की फरक पडेल.

या ही व्यतिरिक्त पौर्णिमेच्या दिवशी आणि आणखी काही उपाय करू शकतात. ते म्हणजे धनप्राप्तीसाठी धनप्राप्तीची इच्छा असलेल्या व्यक्तींनी अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी पुढील मंत्राचा पाच माळ जप करावा मंत्र पुढील प्रमाणे ओम ह्री ऐ क्लीं श्री: या पाच माळा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जप करायचा आहे. यानंतर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ब्राह्मणांना अन्नदान करायच आहे. ब्राह्मणांना दक्षिणा किंवा वस्त्र दिले जाऊ शकतात.

हे भेट म्हणून देऊन त्या ब्राह्मणांना तृप्त कराव. यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो.याबरोबरच तुम्हाला या दिवशी विशेष पूजा करायची असेल तर अधिक मासातील पौर्णिमेला भगवान श्रीहरी विष्णूंचा केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा. हा अभिषेक दक्षिणावरती शंका न केल्यास लवकर शुभ फळ प्राप्त होऊ शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button